दौआला
दौआला हे आफ्रिका खंडामधील कामेरून देशामधील सर्वात मोठे शहर, सर्वात मोठे बंदर व कामेरूनची आर्थिक राजधानी आहे. कामेरूनच्या पश्चिम भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसलेले दौआला मध्य आफ्रिका भागातील सर्वात श्रीमंत शहर आहे.
दौआला Douala |
|
कामेरूनमधील शहर | |
देश | कामेरून |
राज्य | मध्य प्रांत |
क्षेत्रफळ | ३८७ चौ. किमी (१४९ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ० फूट (० मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | ५२,४५,०२४ |
- घनता | १३,५३३ /चौ. किमी (३५,०५० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी + १:०० |
इ.स. १४७२ साली पोर्तुगीज खलाशी येथे दाखल झाले. १८८४ मध्ये हे शहर जर्मनीच्या अधिपत्याखाली आले व कामेरूनश्टाड ह्या नावाने ओळखले जाऊ लागले. १९०७ साली ह्याचे नाव बदलून दौआला ठेवण्यात आले. १९१९ साली पहिल्या महायुद्धानंतर दौआलावर फ्रेंचांनी ताबा मिळवला व फ्रेंच कामेरूनचा भाग बनला. १९४० ते १९४६ दरम्यान दौआला कामेरूनची राजधानी होती.
एफ.सी. बार्सेलोना ह्या फुटबॉल क्लबसाठी खेळणारा अलेक्झांडर सॉंग हा दौआलाचा निवासी आहे.
बाह्य दुवे
संपादन- विकिव्हॉयेज वरील दौआला पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |