देवयानी खोब्रागडे प्रकरण


देवयानी खोब्रागडे ह्या एक भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) अधिकारी आहे. ह्या न्यू यॉर्क शहरात भारतीय वाणिज्य दूतावासाच्या उपकौन्सिल कार्यालयात सनदी सेवेतील अधिकारी होत्या. तेव्हा यांना अमेरिकेत व्हिसा घोटाळा आणि मोलकरणीचे आर्थिक शोषण या प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर देवयानी खोब्रागडे यांची तात्पुरती बदली संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या कायम प्रतिनिधीमंडळात राजनैतिक अधिकारी म्हणून केली आणि नंतर त्यांना भारतात परत बोलावण्यात आले. अमेरिकेतील न्यालयाने हे मान्य केले की देवयानी यांना या प्रकरणात नाहक अडकवण्यात आले होते व त्या निर्दोष आहेत असा निकाल दिला.

देवयानी खोब्रागडेंची संयुक्त राष्ट्रसंघात बदली

संपादन

अमेरिकेतल्या भारताच्या उपमहावाणिज्य अधिकारी देवयानी खोब्रागडे यांची संयुक्त राष्ट्रसंघात बदली करण्यात आली आहे. न्यू यॉर्कमधील त्यांच्या अपमान प्रकरणानंतर भारत सरकारने त्यांची बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. आधी देवयानी खोब्रागडे या न्यू यॉर्कमधल्या भारताच्या काउन्सिलेटमध्ये वाणिज्य अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. बदलीमुळे आता देवयानी यांना कायद्याचे संरक्षण मिळणार आहे. त्यांच्यावर कुठलीही कारवाई करतांना, अगदी त्यांची साधी चौकशी करण्यासाठी देखील, पोलिसांना भारत सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. [] आणि []

देवयानी यांना मिळाला न्याय

संपादन

अमेरिकेतील कोर्टाने अखेर हे मान्य केले की देवयानी यांना या प्रकरणात नाहक अडकवण्यात आले होते व त्या निर्दोष आहेत असा निकाल दिला. या निर्णयामुळे देवयानी यांचा मोठा विजय झाला. देवयानी खोब्रागडे भारतात परतल्या. मात्र त्यांच्या विरुद्धच्या तक्रारीत तथ्य आढळल्याने देवयानी यांना भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये निष्क्रिय/सक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आले.

घटनाक्रम

संपादन
  • २३ जून २०१३ – देवयानी खोब्रागडे यांची मोलकरीण संगीता रिचर्ड भाजी आणण्यासाठी गेली, मात्र ती घरी परतलीच नाही.
  • १ जुलै २०१३ - एका अज्ञात महिलेकडून देवयानीला फोन, जर तुम्ही संगीताचे कॉन्ट्रॅक्ट रद्द केले आणि तिला दर दिवशी १९ तास असा मोबदला देऊ केला तर ती तुमच्या विरोधात कोर्टात जाणार नाही.
  • २ जुलै २०१३ - देवयानी यांनी ही घटना आणि फोनवरील धमकीबाबत फॉरेन मिशन अधिकारी आणि न्यू यॉर्क पोलिसांना कळवले.
  • ५ जुलै २०१३ - देवयानीकडून न्यू यॉर्क पोलिसांकडे रीतसर तक्रार दाखल. मानसिक छळ, खंडणीबाबतची तक्रार. पण पोलिसांकडून कोणतीही कारवाई नाही. याच दरम्यान दिल्ली पोलिसांकडेही तक्रार
  • ८ जुलै २०१३ - इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडून खोब्रागडेंना हजर राहून, दहा हजार डॉलरचा दंड भरण्याचे आदेश. मोलकरणीचा सरकारी पासपोर्ट साधारण पासपोर्टमध्ये बदलला असल्याचा निर्वाळा. भारताने तो पासपोर्ट बदलला होता.
  • ३० जुलै २०१३ - चीफ जस्टिस ऑफ इंडियाने अमेरिकी दूतावासाला कळवले की संगीता रिचर्डला भारतीय दूतावासात हजर करा, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही.
  • २० सप्टेंबर २०१३ - दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय - 'संगीता रिचर्ड परदेशातील कोर्टामध्ये खोब्रागडेंविरोधात तक्रार करू शकणार नाही’
  • २१ सप्टेंबर २०१३ - अमेरिकी एम्बसी म्हणते हे आमचे प्रकरणच नाही.
  • १९ नोव्हेंबर २०१३ - दिल्ली कोर्टाने मोलकरणीच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले.
  • ६ डिसेंबर २०१३ - हे वॉरंट अमेरिकन एम्बसीला पाठवले गेले, पण दुर्लक्षिले गेले.
  • १० डिसेंबर २०१३ - मोलकरणीच्या नवऱ्याला आणि मुलांना अमेरिकेचा व्हिसा दिला गेला आणि ते अमेरिकेत पोहोचले.
  • ११ डिसेंबर २०१३ - देवयानी खोब्रागडे यांना अटक
  • १७ डिसेंबर २०१३ – भारताची आक्रमक भूमिका. अमेरिकन शिष्ट मंडळाची भेट नाकारली. अमेरिकन अधिकाऱ्यांची झाडाझडती, कागदपत्रांची चौकशी
  • १८ डिसेंबर २०१३ - अमेरिकेच्या भूमिकेबाबत संसदेतही पडसाद. अमेरिकेला धडा शिकवण्याची मागणी
  • १९ डिसेंबर २०१३ – अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी फोनवरून खेद व्यक्त केला.
  • ११ जानेवारी २०१४ - देवयानी खोब्रागडे भारतात परतल्या. मात्र त्यांच्या विरुद्धच्या तक्रारीत तथ्य आढळल्याने देवयानी यांना भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये (निष्क्रिय) सक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आले. त्या परराष्ट्र मंत्रालयात संचालक (राज्ये) या पदावर असल्या तरी काहीही काम करण्याची त्यांना मुभा नव्हती.
  • १४ जुलै २०१६ - भारतीय रिपब्लिकन पक्षाचे खासदार (राज्यसभा सदस्य) असलेले केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या खासगी सचिव म्हणून देवयानी खोब्रागडे यांची नेमणूक झाली. रामदास आठवले हे सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री आहेत.

हे सुद्धा पहा

संपादन
  1. ^ Majha, ABP. "ABP Majha". ABP Majha (हिंदी भाषेत). 2013-12-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-17 रोजी पाहिले.
  2. ^ http://www.marathi.pro/?do=readnews&id=12