देवयानी खोब्रागडे
देवयानी खोब्रागडे ह्या एक भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) अधिकारी आहेत. ह्या न्यू यॉर्क शहरात भारतीय वाणिज्य दूतावासाच्या उपकौन्सिल कार्यालयात सनदी सेवेतील अधिकारी होत्या. (Bombay Electric Supply & Transport) बेस्टचे माजी महासंचालक आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उत्तमकुमार खोब्रागडे यांच्या त्या कन्या आहेत. देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकेत तथाकथित व्हिसा घोटाळा आणि मोलकरणीचे आर्थिक शोषण या प्रकरणी अटक करण्यात आली होती.
देवयानी खोब्रागडे | |
---|---|
शिक्षण | एम.बी.बी.एस. |
धर्म | बौद्ध |
त्यानंतर देवयानी खोब्रागडे यांची तात्पुरती बदली संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या कायम प्रतिनिधीमंडळात राजनैतिक अधिकारी म्हणून केली आणि नंतर त्यांना भारतात परत बोलावण्यात आले..
व्यक्तिगत जीवन
संपादनखोब्रागडे यांचे कुटुंब मुळचे महाराष्ट्रातील गडचिरोलीचे असून त्यांचा जन्म महाराष्ट्रातील तारापूर येथे झाला.
देवयानी खोब्रागडे यांचे पती डॉ. आकाशसिंग राठोड हे अमेरिकेत जन्मलेले एक अमेरिकन नागरिक आहेत. ते पीएच.डी., एल्एल.एम असून इटलीतील एका महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. देवयानी आणि आकाशसिंगची जर्मनीत भेट झाली होती. या जोडप्याला दोन मुली आहेत. आकाशसिंग राठोड यांना अर्ज करूनही २०१६ सालापर्यंत भारतीय नागरिकत्व मिळाले नव्हते. डॉ. राठोड हे मद्यनिर्मिती तज्ज्ञ आहेत. त्यांची अमेरिकेत एक पिढीजात वायबरी आहे.
शिक्षण
संपादनदेवयानी खोब्रागडे यांचे शिक्षण मुंबईत माऊंट कार्मेल हायस्कूलमध्ये झाले. मुंबईच्याच जी.एस. मेडिकल कॉलेजातून त्या एम.एम.बी.एस. झाल्या आणि ऑफथॉल्मॉलॉजीत एम.एस. करताना त्यांनी पब्लिक सर्विस कमिशनच्या परीक्षा देऊन त्या आयएफएस झाल्या.
कारकीर्द
संपादनविवाद
संपादनआदर्श इमारत
संपादनदेवयानी खोब्रागडे यांचा एक बेकायदेशीर फ्लॅट मुंबईतील ’आदर्श’ इमारतीत आहे.
अमेरिकेतील व्हिसा प्रकरण
संपादनपुस्तक
संपादन- देवयानी खोब्रागडे आत्मचरित्र लिहित असून अमेरिकेतील अटक प्रकरणी स्वतःची बाजू मांडणार आहेत. मात्र, पुस्तकातून त्या संपूर्ण वास्तव मांडणार का, याबद्दल उत्सुकता आहे. हे पुस्तक पेंग्विनतर्फे डिसेंबर २०१६मध्ये प्रकाशित होणार आहे..