देवबंद हे उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील एक गाव आहे.

या गावात दार-उल-उलूम (उर्दू: دارالعلوم دیوبند) ही मुस्लिम धर्मातील अभ्यासकांची संस्था आहे. ही संस्था भारतात इस्लाममधल्या कट्टर अशा वहाबी पंथाचे शिक्षण देते. इजिप्त येथील मुस्लिम विद्यापीठानंतर या संस्थेचा दर्जा मुस्लिम धर्म अभ्यास जगतात वरचा मानला जातो. देशोदेशीचे विद्यार्थी येथे मुस्लिम धर्म, तत्त्वज्ञान इत्यादींचा अभ्यास करायला येतात. संस्थेतील विद्यार्थ्यांना व विद्वानांना देवबंदी म्हणतात. ही संस्था सतत काहीना काही फतवे काढीत असते.

इतिहास

संपादन

या संस्थेची स्थापना इ.स. १८६६ मध्ये झाली. इ.स. १८५७ मध्ये इंग्रजांशी झालेल्या युद्धात मुस्लिम राज्यकर्त्यांचा पराभव झाला. तत्कालीन मुस्लिम राज्यकर्ते आणि जनता इस्लामच्या शिकवणुकीला विसरली म्हणून हा पराभव झाला, असा या पराभवाचा अर्थ लावला गेला होता, असे मानले जाते. तेव्हा मुस्लिमांना इस्लामचे खरे शिक्षण देण्यासाठी त्यांनी देवबंद या हिंदू नाव असलेल्या गावी शाळा स्थापन केली. कालौघात त्या शाळेचा विस्तार वाढत ते विश्वविद्यालय झाले आहे. तेथे प्रामुख्याने कट्टर धार्मिक शिक्षणावरच भर दिला जातो असे विचारवंत मानतात. देवबंदमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांना देवबंदी असे म्हणतात. देवबंद विद्यापीठामध्ये प्रामुख्याने पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहार येथून मुस्लिम विद्यार्थी येतात. एकेकाळी देवबंद विद्यापीठाच्या अभ्यासकांनी भारताच्या फाळणीला विरोध केला होता. फाळणी केल्यानंतर भारताची इस्लामीकरण करता येणार नाही या विचारामुळे फाळणीला विरोध करण्यात आला होता.

याच प्रकारचे एक विद्यापीठ बरेली येथे आहे.

परिणाम

संपादन

या विद्यापीठातील सुशिक्षितांनी भारत, बांग्लादेश, पाकिस्तान येथे वैचारिक परिणाम साधले आहेत. हे विद्यापीठ अफगाणिस्तान, इंग्लंड आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने येथील मुस्लिमांना संघटित करण्यात मोठी भूमिका घेत असते.

सद्यःस्थिती

संपादन

देवबंदचे महत्त्व लक्षात घेता सर्व भारतातून मुस्लिम विद्यार्थी तेथे धार्मिक शिक्षण घेण्यास येतात. इस्लामीच असलेला अहमदिया पंथ हा त्यांचा कट्टर विरोधक आहे.

देवबंदी फतव्यांवर अनेक पुस्तके आहेत. त्यांपैकी काही ही :

  • The World of Fatwas or the Shariah in Action (अरुण शौरी)
  • Fatwa: Living with a Death Threat (जॅकी ट्रीव्हेन)
  • Fatwa: Hunted in America (पामेला गेलर)

बाह्य दुवे

संपादन