दी एल्डर स्क्रोल्स ५: स्कायरिम

दी एल्डर स्क्रोल्स ५: स्कायरिम (इंग्लिश: The Elder Scrolls V: Skyrim; ज्येष्ठ गुंडाळ्या: स्कायरिम) (थोडक्यात स्कायरिम) हा एक २०११ साली प्रकाशित झालेला संगणक खेळ आहे. ह्याचे विकसन बेथेस्डा गेम स्टुडियोज ह्यांने केलेले असून ह्याचे प्रकाशन बेथेस्डा सॉफ्टवर्क्स ह्यांने केले. खेळाचे दिग्दर्शक टॉड हॉवर्ड व संगीतकार जेरमी सोउल. दी एल्डर स्क्रोल्स ह्या खेळांच्या मालिकेमधील हा पाचवा भाग असून हा नोव्हेंबर ११ २०११ला मायक्रोसॉफ्ट विंडोज, एक्स-बॉक्स ३६०प्लेस्टेशन ३ यांसाठी प्रकाशित करण्यात आला.

स्कायरिमच्या मुख्य कथेत खेळाडू ऍल्डुइन नावाच्या एका ड्रॅगनला मारण्याचा प्रयास करतात. दी एल्डर स्क्रोल्स मधल्या इतर खेळांप्रमाणे हा खेळ निर्न या कल्पित ग्रहाच्या टॅम्रिएल भूखंडात स्थित असून त्यातल्या सर्वात उत्तरेला असणाऱ्या स्कायरिम प्रांतात बसवला आहे. दी एल्डर स्क्रोल्स मालिकेचे विख्यात वैशिष्ट्य, की खेळाडूंना मोकळ्या जगात कुठेही जाण्याचा स्वतंत्र असतो, या भागातसुद्धा दिसून येते. स्कायरिमची अनेक समीक्षकांनी कीर्ती करण्यात आली व ह्याचे प्रकाशित होण्याच्या पहिल्या ४८ तासांमध्येच ३५ लाख प्रत विकण्यात आले.

खेळणेसंपादन करा

दी एल्डर स्क्रोल्सची पारंपारिक अरेषात्मक खेळण्याची शैली या भागात टिकवली आहे. खेळाडू स्कायरिमच्या मोकळ्या जगात पायी किंव्हा घोड्यावरून फिरू शकतात व एकदा शहर, गाव किंव्हा अंधारकोठडीसार्खे ठिकाण आढळ्यावर तिथे ताबडतोब प्रवास करू शकतात. जगात विविध पात्रे खेळाडूला कार्य देतात व हे कार्य पार पडण्याने खेळाडूंना सोने, शस्त्रे, अंगत्राणे व इतर वस्तू बक्षीस म्हणून मिळू शकतात. कोणतेही कार्य न करत असतानासुद्धा खेळाडू पात्रांशी संवाद करू शकतात व काही पात्रांकढून प्रशिक्षण घेऊ शकतात. काही पात्रे लढण्यात खेळाडूंची मदत करण्याकरीता त्यांचे साथीदारसुद्धा होऊ शकतात. खेळाडू स्कायरिममधिल विविध गटांचे भाग व्हायला निवडू शकतात. दर गटाला एक मुख्यालय असते व खेळाडूने पूर्ण करण्यासाठी कार्यांची माळ असते.

जगात फिरत असताना खेळाडूला स्कायरिमचे वन्यजीवन आढळून येऊ शकते. अस्वले, लांडगे व सेबर मांजर यासार्खे प्राणी सर्व खेळाडूवर आक्रमण करतात व त्यांची हत्या करणे शक्य आहे. यांबरोबर ड्रॅगनांच्या असण्याने खेळणे व खथा दोघांवर प्रभाव पडतो.

चारित्र्य विकाससंपादन करा

चारित्र्य विकास हा खेळाचा एक प्राथमिक तत्त्व आहे. खेळाच्या सुरुवातीला खेळाडू आपल्या पात्राची जात, लिंग व स्वरूप निवडतात. जातींमध्ये खेळाडूकढे विविध मानवी, एल्फीय व पशुवत जातींचे पर्याय मिळतात. दर जातीला स्वतःची नैसर्गिक क्षमता असते ज्याचा खेळेवर प्रभाव पडून येतो. खेळाडूच्या पात्राच्या जातीमुळे इतर पात्र खेळेडूशी कशे वागतात-बोलतात यावर सुद्धा फरक पडतो. खेळाडूकढे १८ कौशल्य असतात, जे लढणे, जादू व चोरटेपणा या तीन वर्गात विभाजित आहेत. एका कौशल्याचा वापर करून खेळाडू त्या कौशल्यात सुधारतो व जास्त शक्तीशाली होतो. उधारणासाठी लढाईत आपल्यावर होणारे वार अडवून खेळाडू आपल्या अडवण्याच्या कौशल्यात वाढ बघू शकतो. खेळाडू हे कौशल्य काही पात्रांकढून सोन्याबदली सुधारूनसुद्धा घेऊ शकतात.

कौशल्यात सुधार येण्याने खेळाडू आपला दर्जा वाढवू शकतो. दर्जा वाढण्याने खेळाडूला एक लाभ मिळतो, ज्याने आपल्या कौशल्यांमध्ये एक विशेष क्षमता जोडता याते. खेळाडू दर्जेंमध्ये वाढ ५० वेळा करू शकतात, ज्यानंतर दर्जेंमध्ये वाढ चालू राहतेच, पण अतिशय कमी वेगाने.

लढाईसंपादन करा

खेळाडूकढे तीन गुणधर्म असतात ज्यांच्या मात्रा लढाईत कमी-जास्त होत असत. स्वास्थ्य हा गुणधर्म तेंव्हा कमी होतो जेंव्हा खेळाडू कोणत्याही प्रकाराने जखम सहन करतो, जसे की मार खाऊन किंव्हा उंचावरून खाली पडून. जादू हा गुणधर्म तेंव्हा कमी होतो जेंव्हा खेळाडू जादूई मंत्रांचा वापर करतात. काही वेळा खेळाडूंवर होणारे वारसुद्धा जादूचे गुणधर्म कमी करू शकतात. तिसरा गुणधर्म, दम, तेंव्हा कमी होतो जेंव्हा खेळाडू वेगाने धावतो किंव्हा शक्तीशाली आक्रमण करतो. तीन्ही गुणधर्म ओपोआप पुनर्जनित होतात व त्याना पुन्हा भरण्यासाठी खेळाडू औषधी प्येयांचा वापर करू शकतो.

खेळाडू आपली वस्तुसूची कधीही पाहू शकतो, ज्यात स्वतः बरोबर असणारे सर्व वस्तु ३-डी मध्ये दिसून येतात. याप्रकारे वस्तुंचे निरिक्षण करणे खेळाच्या काही कोडांसाठी आवश्यक असते. लढाईमध्ये खेळाडूच्या अस्त्रांचा व अंगत्राणांचा प्रभाव पडतो. विविध प्रकारचे अस्त्रे व अंगत्राणे खेळात उपलब्ध आहेत, व हे दुकानांमध्ये खरीदले जाऊ शकतात. याशिवाय खेळाडूकढे कच्चा माल असला, तर स्वतःचे अस्त्रे व अंगांत्रणे बनवू शकतो. खेळाडू लढाईत आक्रमण व संरक्षणासाठी जादूचासुद्धा वापर करू शकतात. अस्त्रे व जादू दोन्ही दर हतात सज्ज केले जाऊ शकतात. ह्याने खेळाडूला हवे असले तर एका वेळीस दोन अस्त्रे, एका हातात अस्त्र व एका हातात जादू, किंव्हा दोन्ही हातात जादू सज्ज करू शकतात. याशिवाय खेळाडू एका हातात ढालसुद्धा सज्ज करू शकतात, ज्यांने स्वतःवर होणारे वार अडवता येतात.

अस्त्रे त्यातून दोन प्रकाराचे असू शकतात - एक हातात सज्ज होणारे व दोन हातात सज्ज होणारे. दूरवरून वार करण्यासाठी खेळाडू धनुष्यांचा वापर करू शकतात, जे नाहमीच दोन हातात सज्ज केले जातात. जवळून वार करण्यासाठी अस्त्रांमध्ये खेळाडूंकढे तलवारी, परशु, गदे व युद्ध-हातोडा उपलब्ध असते. मागच्या भागांपासून एक बदल म्हणजे की अस्त्रे व अंगात्रणे दुरुस्त करण्याची किंव्हा सुस्थितीत राखण्याची गरज मिटावली गेली आहे.

खेळाडू चोरटेपणाच्या पद्धतीत दाखल होऊ शकतो, ज्याने तो शत्रूनवर लपून वार करू शकतो. या पद्धतीत शत्रू नसणाऱ्या पात्रांपासून खेळाडू पाकिटमारीसुद्धा करू शकतो.

ड्रॅगनसंपादन करा

खेळाच्या विकासावेळी ड्रॅगनांवर काम करण्यासाठी एक विशेष तुकडी नियोजित केली गेली होती. जगात वेगवेगळे ड्रॅगन एकटे किंव्हा छोट्या समूहांमध्ये दिसून येतात. हे ड्रॅगन यदृच्छेने निर्माण केल जातात, व हे कधीही गावांवर व नगरांवर वार करू शकतात. सर्व ड्रॅगन खेळाडू आक्रमक नसतात व अश्या ड्रॅगनांशी खेळाडू संवाद करू शकतात. मुख्य कार्येत खेळाडूला असे कळून येते की तो ड्रॅगनपुत्र आहे व यामुळे थूउम नावाच्या शक्तिशाली ड्रॅगन मंत्रांचा वापर करू शकतो. दर थूउममध्ये तीन शब्द असतात, जे "शब्द-भिंतांमध्ये" आढळले जातात. त्यापुढे त्यांना खुलण्यासाठी खेळाडू ड्रॅगनांच्या आत्मांचा वापर करतो. ड्रॅगनपुत्र असण्यामुळे खेळाडू ड्रॅगनांना ठार केल्या नंतर त्यांची आत्मा शोषून घेऊ शकतात.

सारांशसंपादन करा

मांडणीसंपादन करा

मालीकेच्या इतर भागांप्रमाणेच, स्कायरिमची कथा आधल्या भागाशी जुडलेली नाही आहे. मालिकेतील आधला भाग ओब्लिवियन यात घडलेल्या घटनांच्या २०० वर्षांनंतर स्कायरिमची कथा सुरू होते. मार्टिन सेप्टिमची मृत्यू व ओब्लिवियन संकट घडल्यानंतर चौथा महाकल्प सुरू झाला. सिरोडीलपासून आलेला एक कोलोवीय सरदार, टाय्टस मीड दुसरा, हा साम्राज्याचे शहर जिंकतो व स्वतःची मीड राजवंश सुरू करतो. साम्राज्याच्या दुर्बल अवस्थेत एल्सवेयर, ब्लॅक मार्श, वॅलेन्वूड, व समरसेट आयल्स हे प्रांत साम्राज्यापासून फुटून निघतात. समरसेट आयल्स व वॅलेन्वूड हे प्रांत ऍल्डमेरी प्रदेश नावाचा एक एल्फीय साम्राज्य बसवून आपल्या संस्थापनेच्या प्रांतांना ऍलीनॉर असे नाव देतात.

स्कायरिम सुरू होण्याच्या ३० वर्ष पुरवी ऍल्डमेरी प्रदेशावर राज्य करणारे थॅल्मोर हे हॅमरफेल व सिरोडीलवर आक्रमण करून "प्रचंड युद्धाची" सुरुवात करतात. ह्या आक्रमणापासून वाचण्यासाठी साम्राज्य "पांढरा-सोनेरी करार" मान्य करतो, ज्याने संपूर्ण साम्राज्यात टॅलोस देवताची पूजा करणे बेकायदेशीर होऊन जाते. "ब्लेड्ज" नावाचे सरदार, जे टॅम्रिएलच्या सम्राटाचे संरक्षण करायचे, ह्यांना थॅल्मोर प्रचंड युद्ध संपल्यावर शिकार करून नष्ट करते. ह्यातून जे काही ब्लेड्ज वाचतात, ते स्वतःला जगापासून विविक्त करून घेतात.

उल्फ्रिक स्टॉर्मक्लोक, स्कायरिममधिल विंडहेल्म शहराचा यार्ल हा टॅलोस-पूजा बेकायदेशीर करण्याला उत्तर देण्यास साम्राज्यापासून फुटून निघण्यासाठी विद्रोह करतो. आपली सत्ता जाहीर करण्यासाठी तो एका द्वंद्वयुद्धात स्कायरिमचा उच्च राजा, टोरीग ह्याला ठार मारतो. प्रतिक्रियेत साम्राज्य आपली साम्राज्याची लीजन तैनात करते.

मागच्या दी एल्डर स्क्रोल्स खेळांप्रमाणे खेळाडूचा पात्र एक अज्ञात कैदी म्हणून खेळ सुरू करतो. शिरच्छेद करण्याकरीता त्याला साम्राज्याचे सैनीक हेल्गेन गावी न्हेतात, पण शिरच्छेद होण्याआधिच एक ड्रॅगन त्या गावावर हल्ला करून नष्ट करून टाकतो. खेळाडू ह्या प्रसंगातून वाचल्यावर शिकतो की स्कायरिम मधील यादवी युद्ध व ड्रॅगनांचे पुन्हा प्रकट होणे ह्या दोघानची ज्येष्ठ गुंडाळ्यांमध्ये भविष्यवाणी केली गेली होती. त्यापुढे त्यांमध्ये असे लिहीलेले असते की ऍलडुइन, नोर्डांचा ड्रॅगन देवता परत येऊन संपूर्ण जगाला खपवून जाईल. खेळाडू हा शेवटचा "डोवाहकीन" (ड्रॅगनपुत्र) असतो, ज्यात एका ड्रॅगनची आत्मा असते व जो ऍल्डुइनच्या येण्याने धोक्यावर मात द्यायला देवत्यांने नेमला गेलेला आहे.

विकसनसंपादन करा

स्कायरिमचे संकल्पनीकरण २००६ मध्ये ओब्लिवियनच्या प्रकाशनानंतरच घडले. २००८ मध्ये फॉलआउट ३च्या प्रकाशनानंतर स्कायरिमचे विकसन सुरू झाले. खेळाच्या विकसन संघात सुमारे १०० जण होते, ज्यात नवीन प्रज्ञेबरोबर मालिकेचे अनुभवी लोकं होती. उत्पादन टॉड हॉवर्ड ह्यांनी केले.

तंत्रशास्त्रसंपादन करा

बेथेस्डाचे स्वतःचे क्रीयेशन इंजिनने खेळ चालवला गेला आहे. बेथेस्डाने असे जाहीर केले आहेत की क्रीयेशन इंजिन सकायरिम सोडल्यास किमान आणखी एका प्रकल्पासाठी वापरले जाईल. फॉलआउट ३च्या प्रकाशनानंतर संघाने पुष्कळ संकल्पन उद्दिष्ट योजले, व हॉवर्डांच्या मते ते सर्व पार पाडून पुढे जात राहिले. जर हे संकल्पन उद्दिष्ट वर्तमान हार्डवेयरवर पार पडता आले नसते, तर संघाने पुढच्या पीढीची वाट पाहून तेंव्हा स्कायरिम प्रकाशित केले असते. क्रीयेशन इंजिन बेथेस्डाच्या मागच्या खेळांपेक्षा उच्च आलेखी अचूकता शक्य झाली. उधारण म्हणजे ड्रॉ दूरी मागच्या सर्व दी एल्डर स्क्रोल्स खेळांपेक्षा जास्त आहे. हॉवर्डांने एक उधारण दिले की खेळाडू एका काट्याला तपशीलवारपणे पाहून वर डोंगर पाहू शकतात व त्याच्या टाकापर्यंत पळू शकतात. गतिक रोषणाई असल्याने खेळ जगातील सर्व वस्तू व बांधकामांची सावली निर्माण होऊन येते. बेथेस्डाने मागच्या खेळांमध्ये वनस्पतिसृष्टी निर्माण करण्याकरीता स्पीडट्रीचा उप्योग केलेला, परंतु क्रीयेशन इंजिनने त्यांना हेचे काम जास्त तपशीलवारपणे करता आले. बेथेस्डाच्या या स्वतःच्या इंजिनने संघाला झाडांच्या फांद्यांना वजन देता आले, ज्याने ते झाड वाऱ्यात कसे हेलकावते यावर प्रभाव पडला. त्याच प्रकारे हवेमुळे पाण्याचा प्रवाहावर प्रभाव पाडवता आला.

संघाने हॅवॉकच्या बिहेवियर टूल्सेटचा वापर केला, ज्याने पात्रांच्या चाळणे, पळणे व धावण्यासारख्या क्रियेंमध्ये जास्त तरलता आणळी व तृतीय पुरुष कॅमेरा पर्यायाची कार्यक्षमता वाढवली. या टूल्सेटने सत् कालात पात्रांशी विवाद करणे शक्य केले, जेंव्हा ओब्लिवियनमध्ये खेळाडू पात्रांशी विवाद करायला जात असताना खेळ जग थांबून कॅमेरा त्या पात्र्याच्या चेहऱ्यावर झूम करायचा. स्कायरिममध्ये खेळाडूशी बोलताना पात्र चालू शकतात व हावभाव करू शकतात. लहान मुले खेळात उपस्थित आहेत, व त्यांची उपस्थिती फॉलआउट ३ सारखी ठेवली आहे - अर्थात, खेळाडू त्यांना कोणत्याही प्रकारे नुकसान नाही पोचवू शकत. ह्याचे कारण की संगणक खेळांमध्ये लहान मुलांवर घडणारा हिंसा दाखवणे हा एक विवादास्पद मुद्दा आहे. ओब्लिवियनसाठी बनवल्या गेलेल्या रेडियंट ए.आय्. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर स्कायरिममधे सुद्धा केलेला आहे, व त्यात सुधारणी आणण्यात आली ज्याने जास्त परामुल्यांने पात्रांना त्यांना हवे ते करता येते. या सुधारलेल्या प्रणालीने पात्र व त्यांच्या पर्यावरणामध्ये आंतरक्रिया शक्य झाले; पात्र शेतकाम, दळण व खाणकाम सारख्या विविध क्रिया करतात व एकमेकांवर प्रतिक्रिया करतात, जसे की संवाद करणे किंव्हा पडलेल्या लूटवरून भांडणे.

संकल्पनसंपादन करा

संघाने खेळाची मांडणी स्कायरिम प्रांतात केली व त्याचे संकल्पन हाताने घडवले. सुमारे ओब्लिवियनच्या सिरोडील प्रांताच्या आकाराचे असून स्कायरिममधील डोंगरांची मोठी संख्या असल्यामुळे खेळाची जागा फुगवली जाते व तिच्यावर प्रवास करणे जास्त कठीण पडते. जगात विविधता आणण्यासाठी त्याला "होल्ड" नावाच्या ९ क्षेत्रांमध्ये वाटले व दर होल्डचे भूमिस्वरूप एकमेकांपासून वेगळे ठेवले. त्यावरून काही जागा गुंतागुंतीचे व श्रीमंत, तसेच काही जागा गरीब व साधे दाखवून स्कायरिमच्या विभिन्न सामाजिक-आर्थिक गटांना दर्शावले. खेळाच्या सर्व दहा जातींना अद्वितीय असे दाखवण्यावर लक्ष्य दिले गेले. हॉवर्डांचे असे म्हणणे आहे की मागच्या दी एल्डर स्क्रोल्स खेळांपेक्षा या खेळाच्या सुरुवातीला जातीची निवड हा खेळाडूंसमोर जास्त महत्त्वाचा निर्णय आहे. ह्याचे कारण की स्कायरिमच्या जगाची संस्कृतित वंशभेदलिंगभेद उपस्थित आहे. पण त्यावर त्यांने असे व्यक्त केले की खेळाडूंची लिंग व जातीच्या निवडीने मोठ्या स्तरेवर खेळावर परिणाम पडणार नाही व की ते फक्त खेळाडूंशी पात्रांच्या विवादामध्ये स्वाद आणते.

जिथे ओब्लिवियनच्या वेळी एका संघमित्राला खेळातल्या अंधारकोठडींच्या संकल्पनेचे काम दिले गेलेले, स्कायरिमच्या १५० अंधारकोठड्यांचे संकल्पन ८ जणांच्या एका छोट्या संघाने घडवले. पात्रांचे आवाजे रेकॉर्ड करण्यासाठी बेथेस्डाने सत्तरपेक्षा जास्त आवाज अभिनेतांना नोकरीस ठेवले. पात्रांसाठी रेकॉर्ड केले गेलेल्या पंक्तींची संख्या ६०,००० पेक्षा जास्त आहे. पात्रयोजनेत क्रिस्टोफर प्लमर, मॅक्स फॉन सुडोव, जोआन ऍलेन, लिन्डा कार्टर, व्लादिमिर कुलिचमाय्कल होगन उपस्थित आहेत. स्कायरिममध्ये एकूण २४४ कार्ये व ३०० हिताच्या जागा आहेत.

संगीतसंपादन करा

मॉरोविंडओब्लिवियनसारखेच या भागाचे संगीतकार जेरमी सोउल राहिले. त्यांने खेळाची मुख्य गाणं "ड्रॅगन्बॉर्न" (इंग्लिश: "Dragonborn"; ड्रॅगनपुत्र) रचले. "ड्रॅगन्बॉर्न"ला रेकॉर्ड करताना तीसपेक्षा जास्त गायकांच्या एका गायकवृंदाचा वापर केला गेला. गाण्याचे गीत खेळ जगातल्या कल्पित ड्रॅगनांच्या भाषेत लिहिले गेले. टॉड हॉवर्डांनी स्कायरिमचं मुख्य गाणं हे रानटी माणसांच्या टाळीने गायले अशी कल्पना केली. हे प्रत्यक्षात आणण्यासाठी सोउलने ३० माणसांच्या गायकवृंदाचे तीन वेगवेगळे रेकॉर्डिंग वापरून असा आभास दिला की नव्वद माणसे एकत्र गात आहेत. गीताची भाषा, ड्रॅकोनिकचा निर्माण बेथेस्डाच्या संकल्पना कलावंत ऍडम ऍडमोविच ह्यांने केला. भाषेला लिहिण्यासाठी ३४ अक्षर असणाऱ्या एका रूनिक शब्दलिपीचा निर्माणही केला गेला.