दिल दोस्ती दिवानगी
दिल दोस्ती दिवानगी हा २०२३ चा शिरीष राणे दिग्दर्शित आणि राजेंद्र राजन निर्मित भारतीय मराठी-भाषेतील रोमँटिक थरारपट आहे. या चित्रपटात स्मिता गोंदकर, चिराग पाटील, कश्यप परुळेकर आणि वीणा जगताप यांच्या प्रमुख भूमिका आहेत.[१][२][३]
दिल दोस्ती दिवानगी | |
---|---|
दिग्दर्शन | शिरीष राणे |
प्रमुख कलाकार | कश्यप परुळेकर, वीणा जगताप, स्मिता गोंदकर, चिराग पाटील |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | १३ ऑक्टोबर २०२३ |
|
या चित्रपटाचे संकलन अमोल खानविलकर यांनी केले असून छायांकन धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे. पटकथा, संवाद आणि कथा दीपक तारकर यांची आहे. संगीत सोनाली उदयने दिले आहे, तर गाणी अवधूत गुप्ते, वैशाली सामंत आणि सोनाली पटेल यांनी गायली आहेत.[४]
कलाकार
संपादन- कश्यप परुळेकर - आदित्य
- वीणा जगताप - श्रिया
- चिराग पाटील - राहुल
- स्मिता गोंदकर - रिया
- तपन आचार्य - प्रतीक
- तीर्था मुरबाडकर - सोनाली
- दुर्वा सलोखे - रोशनी
- सुरेखा कुडची
- विद्याधर जोशी
- प्रदीप वेलणकर
- विजय पाटकर
संदर्भ
संपादन- ^ "खूप झाला ब्रेक! अभिनय क्षेत्रात परतताच वीणा जगतापने दिली गुडन्यूज; झळकणार 'या' चित्रपटात". महाराष्ट्र टाइम्स. 2023-10-07 रोजी पाहिले.
- ^ "'दिल दोस्ती दिवानगी' या दिवशी रुपेरी पडद्यावर". पुढारी. 2023-08-22. 2023-10-07 रोजी पाहिले.
- ^ "Dil Dosti Deewangi: 'Bigg Boss After Veena and Smita's 'Dil Dosti Deewangi'". Medium (इंग्रजी भाषेत). 2023-09-15. 2023-10-07 रोजी पाहिले.
- ^ "खऱ्या मैत्रीचं नातं उलगडणारा 'दिल दोस्ती दिवानगी' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज". साम टीव्ही. 2023-08-22. 2023-10-07 रोजी पाहिले.