दियेगो व्हेलाझ्केझ

दियेगो व्हेलाझ्केझ (स्पॅनिश: Diego Rodríguez de Silva y Velázquez; जून ६, इ.स. १५९९ - ऑगस्ट ६, इ.स. १६६०) हा एक स्पॅनिश चित्रकार होता. बरॉक शैलीमधील सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या व्हेलाझ्केझला चौथ्या फिलिपच्या दरबारात मानाचे स्थान होते. इ.स. १६५६ साली त्याने रेखाटलेले लास मेनिनास हे तैलचित्र पश्चिमात्य कलेमधील एक उत्कृष्ट नमुना मानला जातो.

दियेगो व्हेलाझ्केझ
Diego Velázquez
Diego Velázquez Autorretrato 45 x 38 cm - Colección Real Academia de Bellas Artes de San Carlos - Museo de Bellas Artes de Valencia.jpg
जन्म जून ६, इ.स. १५९९
सेबिया, स्पेन
मृत्यू ऑगस्ट ६, इ.स. १६६०
माद्रिद, स्पेन
राष्ट्रीयत्व स्पॅनिश
पेशा चित्रकार

१९व्या शतकापासून व्हेलाझ्केझच्या कलाकृती अनेक नव्या चित्रकारांसाठी मार्गदर्शक ठरल्या आहेत. एदुआर माने, पाब्लो पिकासो, साल्व्हादोर दाली इत्यादी श्रेष्ठ चित्रकारांनी व्हेलाझ्केझची अनेक चित्रे पुन्हा काढली आहेत.

लास मेनिनास हे व्हेलाझ्केझचे सर्वोत्तम चित्र मानले जाते

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • "व्हेलाझ्केझच्या कलाकृती" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)