दिज प्रथा
सार्थक पवार पिविएस अॉफिशिअल
दिज ही पारधी समाजात पाळली जाणारी एक अनिष्ट प्रथा आहे. आपले पावित्र्य सिद्ध करण्यासाठी स्त्रिला द्यावी लागणारी ही पावित्र्याची परीक्षा आहे.[१]
स्वरूप
संपादनआपली पत्नी किंवा कुटुंबातील अन्य महिला हिचे परपुरुषाशी शारीरिक संबंध असल्याच्या संशयावरून त्या स्त्रिचा पती उकळत्या तेलात एक नाणे (₹१, ₹२, ₹५) टाकतो आणि त्या स्त्रिया ते नाणे उकळत्या तेलातून काढावे लागते. जर ते नाणे उकळत्या तेलातून काढताना स्त्रिचा हात भाजला नाही तर त्या स्त्रिला पवित्र समजले जाते, आणि जर स्त्रिचा हात भाजला तर त्या तिला अपवित्र समजले जाते.[२] पारधी समाजातील स्त्रिला तिचे पावित्र्य सिद्ध करावे लागणारी ही एक अनिष्ट व अमानुष प्रथा आहे.[३]
उदाहरण
संपादनफेब्रुवारी २०२१ मध्ये, उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यात पत्नीच्या चारित्र्याची परीक्षा (दिज) घेतल्याचा प्रकार घडला होता.[४]
संदर्भ
संपादन- ^ "पारधी महिलेला उकळत्या तेलातून नाणं काढायला लावणारं प्रकरण नेमकं काय आहे?". BBC News मराठी. 2021-02-22. 2021-02-22 रोजी पाहिले.
- ^ "पारधी महिलेला उकळत्या तेलातून नाणं काढायला लावणारं प्रकरण नेमकं काय आहे?". BBC News मराठी. 2021-02-22. 2021-02-22 रोजी पाहिले.