दालियान

चीनमधील एक शहर


दालियान (चिनी: 大连市) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील ल्याओनिंग या प्रांतातले एक महानगर आहे. २०१८ साली सुमारे ७० लाख लोकसंख्या असलेले दालियान षन्यांग खालोखाल ल्याओनिंग प्रांतामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. दालियान शहर प्रांताच्या दक्षिण भागात पिवळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून ते पूर्व आशियाचे प्रवेशद्वार मानले जाते. चीनमधील एक प्रगत व सुबत्त शहर म्हणून ओळखले जाणारे दालियान २००६ साली देशामधील निवासासाठी सर्वोत्तम ठिकाण होते.

दालियान
大连市
उप-प्रांतीय दर्जाचे शहर


दालियान is located in चीन
दालियान
दालियान
दालियानचे चीनमधील स्थान

गुणक: 38°54′N 121°36′E / 38.900°N 121.600°E / 38.900; 121.600

देश Flag of the People's Republic of China चीन
प्रांत ल्याओनिंग
स्थापना वर्ष इ.स. १८९९
क्षेत्रफळ १३,२३७ चौ. किमी (५,१११ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ९५ फूट (२९ मी)
लोकसंख्या  
  - शहर ६९,८८,०००
प्रमाणवेळ यूटीसी+०८:००
http://www.dl.gov.cn/

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

  विकिव्हॉयेज वरील दालियान पर्यटन गाईड (इंग्रजी)

  • "अधिकृत संकेतस्थळ" (चिनी भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)