बौद्ध धर्म

'बौद्ध धर्म' भारताच्या श्रमण परंपरेतून निर्मित धर्म आणि तत्त्वज्ञान आहे. या धर्माचे संस्थापक तथागत गौतम बुद्ध होते. इ.स.पू. पाचवे ते सहावे शतक हा त्यांचा जीवनकाल मानला जातो. त्यांच्या निर्वाणानंतर पुढील पाच शतकात बौद्ध धर्माचा भारतभर प्रसार झाला. त्यापुढील दोन हजार वर्षांमधे हा धर्म मध्य, पूर्व आणि आग्नेय जम्बुमहाद्वीपामध्ये पसरला. जगात बौद्ध धर्माचे १५० ते २०० कोटींहून अधिक लोक अनुयायी आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे.

संक्षिप्त सूची

बुद्ध - धम्म - संघ - आर्यसत्ये- अष्टांगिक मार्ग - दहा पारमिता - त्रिशरण - पंचशील - बावीस प्रतिज्ञा

 विशेष लेख

आयुष्मान पूर्ण (सुमारे इ.स. पूर्व ४९८) हे गौतम बुद्धांचे समकालीन बौद्ध भिक्षू होते. महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा उपदेश प्रसारित करणारे ते प्रथम भिक्षू मानले जातात. मज्झिमनिकायाच्या पुण्णोवाद सुत्तामध्ये यांचा उल्लेख आला आहे.

पूर्ण यांचा जन्म सूनापरान्त प्रांतामध्ये सुप्पारक येथे एका व्यापारी कुटुंबात झाला. आपल्या सहकार्‍यांबरोबर व्यापारासाठी श्रावस्ती येथे गेले असता त्यांना गौतम बुद्धांचे प्रवचन ऐकण्याची संधी मिळाली. अशी अनेक प्रवचने ऐकल्यानंतर त्यांच्या मनात वैराग्याची भावना निर्माण हौउन त्यांनी गौतम बुद्धांकडे प्रव्रज्येची मागणी केली. अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर त्यांनी बुद्धाकडे परत आपल्या प्रदेशात जाण्याची मागणी केली. बुद्धांनी त्यांना संक्षिप्त उपदेश देऊउन त्यांना आपल्या प्रांतात जाण्याची अनुमती दिली.

पूर्ण यांनी आपल्या प्रांतात एकाच वर्षात ५०० स्त्री-पुरुषांना बौद्ध धर्माच्या उपासकांची दीक्षा दिली. आपल्या आयुष्याच्या अंतापर्यंत पूर्ण यांनी आपल्या प्रांतात धर्मप्रचार-प्रसाराचे कार्य केले. त्यांच्या मृत्यूची बातमी बुद्धांना मिळाल्यावर बुद्धांनी त्यांच्याविषयी "पूर्ण एक कुलपुत्र पंडित होता. त्यास परीनिर्वाण प्राप्त झाले" असे उद्गार काढले.

 संबंधीत माहिती

 विशेष चित्र

श्री महाबोधी वृक्ष, बौद्ध गया.

 विकी उवाच

बुद्ध कोणी परका नाही. कोणत्याही अर्थाने परका नाही. वैरी तर नाहीच नाही. खरे तर तो आपल्याच अंतःशक्तीचे साकार रूप आहे -- आपल्याच सर्वस्वाचे अस्सल सार आहे. आपण पूर्णपणे फुलल्यावर जसे दिसू, अगदी तंतोतंत तसा बुद्ध आहे. किंबहुना, आपण त्याचे अविकसित पूर्वरूप आहोत आणि तो आपले विकसित उत्तररूप आहे.

~आ.ह. साळुंखे (सर्वोत्तम भूमिपुत्र: गोतम बुद्ध)



बदला

 तुम्ही काय करू शकता

==अपेक्षित लेख ==