पारमिता
पारमिता (संस्कृत, पाली) किंवा पारमी (पाली) म्हणजे "परिपूर्णता" किंवा "पूर्णत्व" होय. तांत्रिकदृष्ट्या, पारमी आणि पारमिता दोन्ही पाली भाषेचे शब्द आहेत, पाली साहित्यात पारमीचे बरेच संदर्भ आहेत.[ संदर्भ हवा ]
दहा पारमिता
संपादनदहा पारमिता ह्या शील मार्ग आहेत.
- १) शील
शील म्हणजे नीतिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे असलेला मनाचा कल. शरीर आणि मन शुद्धी करणे.
- २) दान
स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त, देह अर्पण करणे. देनाचा भाव मनात ठेवून देत राहणे.
- ३) उपेक्षा
निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे.
- ४) नैष्क्रिम्य
ऐहिक सुखाचा त्याग करणे.घर त्याग करून परिव्राजक होऊन जगणे.
- ५) वीर्य
हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे.
- ६) शांती
शांति म्हणजे क्षमाशीलता, द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे. मानव जाणीपूर्वक शांत राहणे निवडतो. त्याला द्वेषाने उत्तर देणे मोठ्या मनाने टाळतो.
- ७) सत्य
सत्य म्हणजे खरे, माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये. सत्य पूर्ण व्यवहार करणे.
- ८) अधिष्ठान
ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय. चांगल्या ध्येय असणे देखील बंधनकारक आहे.
- ९) करुणा
मानवासकट सर्व प्राणिमात्रांविषयी प्रेमपूर्ण दयाशीलता व्यवहार करणे.
- १०) मैत्री
मैत्री म्हणजे सर्व प्राणी, मित्र, शत्रू याविषयीच नव्हे तर सर्व जीवनमात्रांविषयी बंधुभाव बाळगणे.[ संदर्भ हवा ]