दहिसर तर्फे माहीम हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.

  ?दहिसर तर्फे माहीम

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ .११३४३ चौ. किमी
जवळचे शहर पालघर
जिल्हा पालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
२७२ (२०११)
• २,३९८/किमी
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा वाडवळी,आदिवासी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०११०२
• +०२५२५
• एमएच४८

भौगोलिक स्थान

संपादन

पालघर रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला माहीम मार्गाने गेल्यावर केळवे गावातून दांडाखाडी पूल ओलांडल्यावर भवानगड गावानंतर हे गाव लागते. पालघरपासून हे गाव २१ किमी अंतरावर आहे.सफाळे रेल्वे स्थानकापासून हे गाव रामबाग चटाळे मार्गाने ११ किमी अंतरावर आहे.

हवामान

संपादन

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.

लोकजीवन

संपादन

हे मध्यम आकाराचे छोटे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ७६ कुटुंबे राहतात. एकूण २७२ लोकसंख्येपैकी ११८ पुरुष तर १५४ महिला आहेत. गावाची साक्षरता ७५.४३ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८१.१९ आहे तर स्त्री साक्षरता ७०.९९ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ४० आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १४.७१ टक्के आहे.वाडवळ आणि आदिवासी समाजातील लोक येथे राहतात.

नागरी सुविधा

संपादन

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस सफाळे रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. ऑटोरिक्षा सुद्धा सफाळेवरून दिवसभर उपलब्ध असतात.

जवळपासची गावे

संपादन

माकुणसार, विळंगी, खटाळी, दांडा, उसरणी, टिघरे,आंबोडेगाव, आगरवाडी, कपासे, पारगाव, सोनावे ही जवळपासची गावे आहेत.भादवे ग्रामपंचायतीमध्ये भादवे आणि दहिसर तर्फे माहीम गाव येते.

संदर्भ

संपादन

https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc

३. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

४. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

५. http://tourism.gov.in/

६. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036

७. https://palghar.gov.in/

८. https://palghar.gov.in/tourism