दशरथ मौर्य हा मौर्य साम्राज्याचा चौथा सम्राट होता. तो सम्राट अशोकाचा नातू व उत्तराधिकारी होता. इ.स.पू. २३२ ते इ.स.पू. २२४ पर्यंतच्या त्याच्या सत्ताकालात साम्राज्याची मोठी घट झाली व सातवाहनांप्रमाणे अनेक राज्यकर्त्यांनी स्वातंत्र्य घोषित केले.