दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२१-२२
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी सप्टेंबर २०२१ दरम्यान श्रीलंकेचा दौरा केला. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळविण्यात आली. पूर्वनियोजनाप्रमाणे हा दौरा जून २०२० मध्ये होणार होता. परंतु कोरोनाव्हायरसच्या फैलावामुळे दौरा पुढे ढकलण्यात आला होता, तथापि सप्टेंबर २०२१ मध्ये दौरा होणार असल्याचे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने जाहीर केले. सर्व सामने कोलंबोतील रणसिंगे प्रेमदासा मैदानावर खेळविण्यात आले.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२१-२२ | |||||
श्रीलंका | दक्षिण आफ्रिका | ||||
तारीख | २ – १४ सप्टेंबर २०२१ | ||||
संघनायक | दासून शनाका | टेंबा बवुमा (१ला ए.दि.) केशव महाराज (२रा,३रा ए.दि., ट्वेंटी२०) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | श्रीलंका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | चरिथ असलंका (१९६) | जानेमन मलान (१६२) | |||
सर्वाधिक बळी | दुश्मंत चमीरा (४) वनिंदु हसरंगा (४) महीश थीकशाना (४) |
तबरैझ शम्सी (८) | |||
मालिकावीर | चरिथ असलंका (श्रीलंका) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | दिनेश चंदिमल (७१) | क्विंटन डी कॉक (१५३) | |||
सर्वाधिक बळी | वनिंदु हसरंगा (३) | ब्यॉर्न फॉर्टुइन (५) | |||
मालिकावीर | क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका) |
श्रीलंकेने पहिला एकदिवसीय सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या सामन्यात जोरदार पुनरागमन करत पावसाचा व्यत्यय आलेला सामना ६७ धावांनी जिंकत मालिका एक सामना शेष असताना १-१ अश्या बरोबरीच्या स्थितीत आणून ठेवली. दक्षिण आफ्रिकेचा नियमीत कर्णधार टेंबा बवुमाला पहिल्या सामन्यात दुखापत झाल्याने उर्वरीत दोन एकदिवसीय सामन्यांसाठी केशव महाराज याने दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले. श्रीलंकेने तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात ७८ धावांनी विजय मिळवत एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली. एकदिवसीय मालिकेत पराभव पत्करावा लागल्यानंतर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका ३-० ने जिंकून दक्षिण आफ्रिकेने दौऱ्याचा विजयाने समारोप केला.
२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादन२रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४७ षटकांचा करण्यात आला. त्यानंतर श्रीलंकेला ४१ षटकांमध्ये २६५ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
- जॉर्ज लिंडे (द.आ.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- विश्वचषक सुपर लीग गुण : दक्षिण आफ्रिका - १०, श्रीलंका - ०.
३रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
- महीश थीकशाना (श्री) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- विश्वचषक सुपर लीग गुण : श्रीलंका - १०, दक्षिण आफ्रिका - ०.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
संपादन१ला सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- महीश थीकशाना (श्री) आणि केशव महाराज (द.आ.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
संपादन३रा सामना
संपादन