दक्षा शेठ
दक्षा शेठ ह्या कथक नृत्यांगना, नृत्य दिग्दर्शिका, मार्शल आर्ट्सचा प्रभाव असलेल्या पूर्व भारतातील प्राचीन छऊ नृत्य मधील त्या पहिल्या भारतीय महिला नृत्यांगना तसेच नृत्यात हवाई तंत्राची ओळख करून देणारी पहिली नृत्य दिग्दर्शिका आहे. त्यांच्या योगदानाबद्दल २०१० मध्ये दक्षा यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे.[१]
दक्षा शेठ | |
---|---|
आयुष्य | |
जन्म | २६ मार्च १९५२ |
जन्म स्थान | अहमदाबाद , गुजरात, भारत |
व्यक्तिगत माहिती | |
नागरिकत्व | भारतीय |
देश | भारत |
गौरव | |
पुरस्कार | संगीत नाटक अकादमी पुरस्कार |
ओळख
संपादनश्रीमती दक्षा शेठ यांचा जन्म २६ मार्च १९५२ रोजी [२] गुजरात मधील अहमदाबाद येथे झाला. दक्षा शेठ यांच्या पतीचे नाव देव इस्सारो आहे त्यांना दोन मुलं आहेत मुलगी ईशा शरवानी आणि मुलगा ताओ.[३] श्रीमती दक्षा शेठ यांनी सुरुवातीला श्रीमती कुमुदिनी लाखिया, पंडित बिरजू महाराज आणि मोहन राव कल्याणपूरकर यांच्याकडे कथक नृत्याचे प्रशिक्षण घेतले नंतर कृष्णचंद्र नायक, श्रीकांत सेन आणि लाल मोहन फत्रा यांच्याकडून मयूरभंज छऊ नृत्य शिकले. तिने गोविंदन कुट्टी नायर आणि सत्यनारायण नायर यांच्या हाताखाली कलरीपायट्टु प्रशिक्षण घेतले. तिने वंदावन येथे कल्याण प्रसाद शर्मा यांच्याकडे ब्रज कलाचा अभ्यास केला.[४]
कारकीर्द
संपादनश्रीमती दक्षा शेठ यांनी १९८० च्या दशकात कथक नृत्यांगना म्हणून नाव कमावले. नंतर, तिने कथकच्या बाहेर विविध हालचालींचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि अनेक शैलींमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. तिचे कोरिओग्राफिक कार्य कथक, छऊ आणि कलरीपायट्टु यांच्यापासून प्रेरणा घेत, ज्यामध्ये पारंपारिक आणि समकालीन नृत्याचा सौंदर्याचा मेळ आहे. तिच्या समूह कार्याला भारत आणि परदेशात समीक्षकांची प्रशंसा मिळाली आहे. १९९३ मध्ये, श्रीमती शेठ यांनी तिरुअनंतपुरममध्ये दक्षा शेठ डान्स कंपनीची स्थापना केली[५] जिथे त्या कलाकारांना प्रशिक्षण देतात आणि त्यांची कौशल्ये सादर करण्यासाठी त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देतात.[६]
पुरस्कार
संपादनतिला संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक सन्मान बहाल करण्यात आले आहेत. २००२ अंतरा काक आणि सिद्धार्थ काक यांनी निर्मित केलेल्या दक्षा शेठवरील माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.[७] २०१० मध्ये सर्जनशील आणि प्रायोगिक नृत्यातील योगदानासाठी श्रीमती दक्षा शेठ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे.[८]२०१५ मध्ये DACA (Dancers and Choreographers Association) द्वारा "नृत्य परमाचार्य" पुरस्कार मिळाला आहे.[९]
संदर्भ
संपादन- ^ "President of India Smt. Pratibha Devisingh Patil Confers Sangeet Natak Akademi Fellowships and Akademi Awards 2009". pib.gov.in (English भाषेत). 28 September 2010. 16 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 March 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Daksha Sheth". ccrtindia.gov.in (English भाषेत). 30 October 2020. 16 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 March 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Bringing Shakespeare back to life". rediff.com (English भाषेत). 16 March 2023. 16 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 March 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Dance beyond boundaries". thehindu.com (English भाषेत). 8 February 2010. 16 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 March 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Daksha Sheth Dance company is all set to stage SHIVA SHAKTI, with t2". telegraphindia.com (English भाषेत). 24 October 2014. 16 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 March 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Akademi Award: Creative and Experimental Dance" (PDF). sangeetnatak.gov.in (English भाषेत). 16 March 2023. 16 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 16 March 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Creative daughters of celebrity parents". tribuneindia.com (English भाषेत). 16 June 2002. 16 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 March 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Sangeet Natak Akademi award for Vyjayanthi". Deccanherald.com (English भाषेत). 15 February 2010. 16 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 March 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "DACA Awards Announced". newindianexpress.com (English भाषेत). 28 April 2015. 16 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 March 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)