तुकोजी होळकर

(तुकोजीराव होळकर या पानावरून पुनर्निर्देशित)

तुकोजी होळकर (१७२३ - १५ ऑगस्ट, १७९७) हा होळकर घराण्यातील मल्हारराव होळकर यांचा दत्तकपुत्र असून तो अहिल्याबाई होळकर यांच्या सैन्याचा सेनापती होता.


तुकोजी होळकर हे राजे मल्हारराव होळकर यांचे दत्तकपुत्र होत. पानिपतच्या पराभवानंतर होळकरांचे मराठा साम्राज्यातील स्थान कमजोर होऊ लागले. पेशव्यांच्या दरबारात देखील होळकरांना दुय्यम स्थान मिळू लागले. अनेक मातब्बर घराणी पेशव्यांना होळकरांची जहागीर जप्त करावी अशा विनवण्या करू लागली. परंतु सातारा छत्रपतींचे विश्वासू असल्याने पेशवे होळकरांच्या जहागीर जप्त करू शकले नाहीत. सन १७६५मध्ये मल्हाररावांचे निधन झाल्यामुळे इंदूर संस्थान काही काळ अंधारात गेले. तुकोजी वगळता होळकर घराण्यातील मातब्बर माणसे युद्धात मारली गेली होती. त्यामुळे अहिल्याबाई होळकरांना पेशव्यांनी इंदूर संस्थान प्रमुख केले, तर तुकोजींना इंदूर लष्कर प्रमुख.

तुकोजींनी माधवराव पेशव्यांना साम्राज्य विस्तारात बरीच मदत केली. याशिवाय होळकर फौजेचा विस्तारदेखील केला. सन १७७०मध्ये माधवराव यांच्या नेतृत्वात मराठा सैन्य दिल्लीवर चाल करून गेले, तेव्हा या सैन्यात तुकोजींचासुद्ध सहभाग होता. तुकोजींनी 1१०,००० सैनिकांचे नेतृत्व केले होते.


.