तुंग
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
तुंग हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
तुंग | |
मुख्य प्रवेशद्वार,तुंग | |
नाव | तुंग |
उंची | ३,००० फूट. |
प्रकार | गिरिदुर्ग |
चढाईची श्रेणी | सोपी |
ठिकाण | पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
जवळचे गाव | लोणावळा |
डोंगररांग | |
सध्याची अवस्था | दुर्ल़क्षित |
स्थापना | {{{स्थापना}}} |
११ जून १६६५ रोजी झालेल्या पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या २३ किल्ल्यांपैकी तुंग हा एक किल्ला होता.
तुंग किल्ला कुठे आहे
संपादनमहाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्रदेश आहेत.त्यातीलच एक पवन मावळ! या प्रांतात निसर्गाची मनसोक्त उधळण पहायला मिळते, उंच डोंगर,धडकी भरवणारे उभे कडे,दऱ्यांतून वाहणारे पाणी, धबधबे अशा संपूर्ण वातावरणा मुळे आपसूकच पर्यटकांची पावले या भागात वळतात. याच पवन मावळात मराठ्यांच्या इतिहासातील अनेक महत्त्वाचे किल्ले आहेत
पवन मावळात लोहगड, विसापूर, तुंग, आणि तिकोना हे किल्ले आहेत.यातील तुंग किल्लाची माहिती पाहत असताना त्यांचे भौगोलिक स्थान खूप महत्त्वाचे मानले जाते. पूर्वीच्या काळी बोरघाट या व्यापारी मार्गावर लक्ष देण्यासाठी व पवन मावळातील हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी तुंग किल्ल्याचा उपयोग होत असे
कसे जाल ?
संपादनया गडावर जाणाऱ्या सर्व वाटा पायथ्याच्या तुंगवाडीतूनच जातात. या वाडीतून गडावर जाण्यास साधारणत: ४५ मिनिटे लागतात. गडमाथा तसा लहान असल्यामुळे एक तासात सर्व गड पाहून होतो.
१) घुसळखांब फाटा मार्गे :-
गडावर जाण्यासाठी लोणावळा स्टेशनवर पोहोचावे. येथून भांबूर्डे अथवा आंबवणे कडे जाणारी एस.टी. पकडून २६ कि.मी. अंतरावरील घुसळखांब फाट्यापाशी उतरावे. या फाट्यापासून दीड तासांची पायपीट केल्यावर आपण ८ कि.मी. अंतरावरील तुंगवाडीत पोहोचतो. येथून गडावर पोहचण्यास ४५ मिनिटे लागतात.
२) ब्राम्हणोली - केवरे मार्गे :-
अनेकजण तिकोना ते तुंग असा ट्रेकदेखील करतात. यासाठी तिकोना किल्ला पाहून तिकोना पेठेत उतरावे आणि काले कॉलनीचा रस्ता धरावा. वाटेतच ब्राम्हणोली गावं लागते. या गावातून लॉंच पकडून पवनेच्या जलाशयात जलविहाराची मौज लुटत पलीकडच्या तीरावरील केवरे या गावी यावे. केवरे गावापासून २० मिनिटातच आपण तुंगवाडीत पोहोचतो.
३) तुंगवाडीच्या फाट्या मार्गे :-
जर लॉंचची सोय उपलब्ध नसेल तर, तिकोनापेठेतून दुपारी ११.०० वाजताची एस.टी. महामंडाळाची कामशेत - मोरवे गाडी पकडून मोरवे गावाच्या अलीकडच्या तुंगवाडीच्या फाट्यावर उतरावे. येथून पाऊण तासांची पायपीट केल्यावर आपणं तुंगवाडीत पोहोचतो.
इतिहास
संपादनपवन [मावळ] प्रांतातील तुंग किल्ला हा एक घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो. पूर्वी बोरघाटामार्गे चालणा-या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे. या किल्ल्यावरून पवना धरण,लोहगड, विसापूर,तिकोणा,मोरगिरी पवन मावळ हा सर्व परिसर नजरेत येतो.
या किल्ल्याला तशी वैभवशाली इतिहासाची परंपरा लाभलेली नाही. मात्र १६५७ मध्ये मावळ प्रांतातील इतर किल्ल्यांसमवेत हा किल्ला देखील स्वराज्यात सामील झाला. सन १६६० मध्ये या भागाच्या सुरक्षिततेसाठी[नेताजी पालकर]यांची नियुक्ती झाली. जयसिंगाने आणि दिलेरखानाने आपल्या स्वारीच्या वेळी ६ मे १६६५ रोजी तुंग आणि [तिकोना] या भागातील अनेक गावे जाळली पण हे किल्ले मात्र जिंकू शकले नाही. १२ जून १६६५ [पुरंदर] तहानुसार १८ जूनला कुबादखानाने हलालखान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला.
छायाचित्रे
संपादनगडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
संपादनगडमाथा फारच आटोपता असल्यामुळे एक तासात सर्व गड पाहून होतो. तुंगवाडीतून गडावर जाणारी वाट मारुतीच्या मंदिरा जवळून जाते. या मंदिरात ५ ते ६ जणांची राहण्याची सोय होते. या मंदिरापासून थोडाच अंतरावर गडावर जाण्यासाठी पायऱ्या लागतात. पायऱ्यांच्या वाटेत थोड्याच अंतरावर हनुमान मंदिर लागते. पुढे गोमुखी रचनेचा दरवाजा आहे. येथून आत शिरल्यावर आपण गड माथ्यावर पोहोचतो. उजवीकडे गणेशाचे मंदिर आहे. मंदिराच्या मागील बाजूस पाण्याचा खंदक आढळतो. येथूनच बालेकिल्ल्यावर जाणारी वाट आहे. बालेकिल्ल्यावर तुंगीदेवीचे मंदिर आहे. मंदिरा समोरच जमिनीत खोदलेली गुहा आहे. यात पावसाळ्याशिवाय इतर ऋतूत २ ते ३ जणांची राहण्याची सोय होऊ शकते. अशा प्रकारे एक दिवसात किल्ला पाहून लोणावळ्याला परतता येते.
गडावरील राहायची सोय
संपादनतुंगवाडीतील मारुतीच्या मंदिरात ६ ते ७ जणांची राहण्याची सोय होते. तुंगवाडीत भैरोबाचे मंदिर आहे. यात २ जणांना राहता येते.
गडावरील खाण्याची सोय
संपादनपायथ्याला जेवणाची सोय उपलब्ध आहे. गडावर कोणत्याही प्रकारची दुकाने किंवा जेवणाची सोय नाही.
गडावरील पाण्याची सोय
संपादनमंदिरा जवळच गावात पाणी उपलब्ध आहे. पावसाळ्यात गडावरील टाक्यात पाणी उपलब्ध असते.
गडावर जाण्याच्या वाटा
संपादनब्राम्हणोली-केवरे: अनेकजण तिकोना ते तुंग असा ट्रेक देखील करतात. यासाठी तिकोना किल्ला पाहून तिकोनापेठेत उतरावे आणि काळे कॉलनीचा रस्ता धरावा. वाटेतच ब्राम्हणोली गावं लागते. या गावातून लॉंच पकडून पवनेच्या जलाशयात जलविहाराची मौज लुटत पलीकडच्या तीरावरील केवरे या गावी यावे. केवरे गावा पासून २० मिनिटातच आपण तुंगवाडीत पोहोचतो.
तुंगवाडीच्या फाटा मार्गेः जर लॉंचची सोय उपलब्ध नसेल तर तिकोनापेठेतून दुपारी ११.०० वाजताची एस.टी. महामंडाळाची कामशेत-मोरवे गाडी पकडून मोरवे गावाच्या अलीकडच्या तुंगवाडीच्या फाटावर उतरावे. येथून पाऊण तासांची पायपीट केल्यावर आपणं तुंगवाडीत पोहचतो.
मार्ग
संपादनजाण्यासाठी लागणारा वेळ
संपादनकमीत कमी 30 मिनिटे ते 1 तास लागतो. आपण बसून व थांबून 1 तास 15 मिनिटात पोहचू शकता.
संदर्भ
संपादनहे सुद्धा पहा
संपादन