तिखट (चव)
तिखट ही चव नाही.
आंबट, गोड, खारट, तुरट, कडू ही काही चाविंची उदाहरणे आहेत.
तिखट ही चव नाही तर तोंडाचा दाह होतो. कुळातील वनस्पती कॅप्सायसायनॉइड प्रकारची संयुगे असतात. त्यापकी कॅप्सायनिन हे संयुग आपल्या वापरातील मिरच्यांत आढळतं. त्यामुळेच मिरचीला तिखटपणा आलेला असतो. तिखटपणा 'स्कोविल' या एककात मोजतात. आपल्या भोपळी मिरची तिखटपणा एक स्कोविल पेक्षा कमी आहे, तर नेहमीच्या वापरातील मिरची १०,००० स्कोविल तिखट असते. अस्सल कॅप्सायनिन १००,०००,००० स्कोविलचं असतं. जर एक लाख पाण्याच्या थेंबांत त्याचा एक थेंब मिसळला आणि या द्रावणाचा एक थेंब जिभेवर ठेवला, तर तोंडाचा जाळ होईलच, पण जिभेवर फोडही येतील.
मिरची तिखट असते.