तिकोना हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.


तिकोना (वितंडगड)

(वितंडगड)
नाव तिकोना (वितंडगड)
उंची ११०० मी.
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव तिकोना पेठ
डोंगररांग -
सध्याची अवस्था चांगली
स्थापना {{{स्थापना}}}


पवना नदीवरील धरणाजवळ पुण्याच्या साधारण ६० कि.मी. अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३,५०० फूट उंच आहे. या किल्ल्यावरून ३-४ कि.मी. अंतरावरील तुंग किल्ला दिसतो. किल्ल्याच्या त्रिकोणी आकारामुळे याला तिकोना असे नाव पडले आहे .

इतिहास

संपादन

तिकोना गडाचा फारसा इतिहास उपलब्ध नाही. परंतु पंधराव्या शतकाच्या अखेरीस, मलिक अहमद निजामशहा याने इ.स. १४८२-८३ च्या सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून जुन्नरचा बराचसा प्रांत आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर त्याने लोहगड काबीज केला. नंतर त्याने आपला मोर्चा तुंग व तिकोना गडांकडे वळविला.इ.स. १४८५ मध्ये मलीक अहमद निजामशाहने हा किल्ला जिंकून निजामशाहीत आणला. इ.स. १६५७मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून परत स्वराज्यात आणला. पुढे ११ जून १६६५ साली झालेल्या इतिहास प्रसिद्ध 'पुरंदरचा तहात' शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या २३ किल्ल्यांपैकी तिकोना हा एक किल्ला होता. नेताजी पालकर यांच्याकडे काही दिवस तिकोना किल्ल्याची जबाबदारी होती.

छायाचित्रे

संपादन

गडावरील ठिकाणे

संपादन

गडमाथ्यावर त्रिंबकेश्वर महादेवाचे छोटेखानी मंदिर, एक तलाव, २ तळी व धान्य कोठाराचे पडीक अवशेष आढळतात. बालेकिल्ल्याच्या खालील भागात श्री तुळजाईचे मंदिर आहे. मंदिर असलेले लेणे सातवाहनोत्तरकालीन असावे. या दक्षिणाभिमुखी लेण्यात एक टाके खोदलेले आहे. लेण्यासमोरच एक तळेही आहे. लेण्यासमोर एका कोरीव दगडावर दोन भागात काम केले आहे. वरच्या बाजूस एक पुरुषाकृती असून त्याच्या पायाखाली बाई दाखविलेली आहे. खालच्या भागात दोन स्त्रिया असून त्यांच्या हातात फुलांच्या माळा आहेत.

गडावर जाण्याच्या वाटा

संपादन

तिकोना पेठेतून जाणारी वाट उभ्या कड्यावरून थेट गडाच्या दरवाज्यात जाते. गडावर प्रवेश करण्यासाठी चार दरवाजे ओलांडावे लागतात.

मार्ग

संपादन
पुणे - जवण नं. 1 ही बस घेऊन गडाच्या पायथ्याशी जाता येते, किंवा कामशेत-कालेकॉलनीमार्गे तिकोना पेठेत पोहोचता येते. लोणावळा-दुधिवरे खिंड मार्हीगे काले -तिकोनाला जाता येते.

तिकाेना किल्ल्यावर ट्रेकिंग करताना खालीलप्रमाणे काळजी घेतात

संपादन
- किल्ला चढताना ग्रिप असलेल्या शूजचा वापर.. शक्यताे टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट परिधान करतात.
- साेबत पाण्याची बाटली आणि फस्ट एड किट बाळगतात.
- माहिती असलेल्या तसेच किल्ल्यावर दर्शविलेल्या वाटेवरूनच किल्ल्यावर चढाई करतात. अन्यथा वाट चुकण्याची शक्यता असते.
- अनेक सरपटणाऱ्या प्राण्यांचा धाेका असताे, त्यामुळे लोक माहिती असलेल्या वाटेनेच जातात.


बाह्य दुवे

संपादन

नकाशा :

[रानवाटा]