तासगाव-कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघ
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.
(तासगाव - कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)
तासगांव-कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघ - २८७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, तासगांव-कवठे महांकाळ मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुका आणि तासगांव तालुका (विसापूर महसूल मंडळ वगळून) यांचा समावेश होतो. तासगांव-कवठे महांकाळ हा विधानसभा मतदारसंघ सांगली लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुमन रावसाहेब (आर. आर.) पाटील हे तासगांव-कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
संपादननिवडणूक निकाल
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
तासगांव-कवठे महांकाळ | ||
उमेदवार | पक्ष | मत |
रावसाहेब रामराव पाटील | राष्ट्रवादी | ९९,१०९ |
दिनकर बाळासाहेब पाटील | शिवसेना | ३३,९३६ |
कर्नल भगतसिंग देशमुख | अपक्ष | ९,७३६ |
स्वप्नील दिलीप पाटील | अपक्ष | ५,३१० |
सचिन शिरीषकुमार पाटील | अपक्ष | ३,६१५ |
उल्हास नामदेव भंडारे | बसपा | २,३५१ |
राजेंद्र उत्तमराव पाटील | अपक्ष | १,२५१ |
अशोक ज्ञानू माने | स्वभाप | १,१४८ |
सुभाष सोपान जाधव | अपक्ष | १,०८६ |
नानासाहेब आनंदराव शिंदे | अपक्ष | ५३३ |
विजय जालिंदर पाटील | अपक्ष | ४६८ |
संदर्भ
संपादन- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |