तपकिरी डोक्याची केगो
तपकिरी डोक्याची केगो, धोबा, सरोता, कंबवली, केगो, कीर किंवा कुरव (इंग्लिश:browonheaded gull) हा एक तपकिरी डोक्याचा पक्षी आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
आकाराने डोमकावळ्यापेक्षा मोठा. वरून राखी खालून पांढरा. उन्हाळ्यात त्याच्या डोक्याच रंग कॉफिसारखा तपकिरी दिसतो.थंडीत ते जेव्हा भारतात असतात, तेव्हा डोके राखट सफेद रंगाचे असते. पंखाची टोके काळी त्यावर आरश्यासारखा पांढरा डाग चोच व पाय लाल. कानाला कठोर वाटणारा गेक गेक असा आवाज. का-येक ,का-येक असे मोठ्या आवाजात आक्रंदन.
वितरण
संपादनभारताच्या पश्चिम व पूर्व समुद्रकिनाऱ्यावर आढळतात. क्वचितच समुद्रापासून दूर अश्या नद्या व सरोवरांतही आढळतात.
निवासस्थाने
संपादनसमुद्रकिनारे, नद्या आणि सरोवरे.
संदर्भ
संपादन- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली