प्रताप तत्त्वज्ञान केंद्र
प्रताप तत्त्वज्ञान केंद्र हे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे तत्त्वज्ञान या विषयाचे भारतीय पातळीवरील अभ्यास केंद्र आहे. ते श्रीमंत प्रतापशेठ यांनी जुलै १९१६ मध्ये स्थापन केले. ते सध्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी जोडलेले आहे. २०१६ हे केंद्राचे शताब्दी वर्ष आहे. हे केंद्र पुणे विद्यापीठाशी जोडले गेले होते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना १९९० च्या दशकात झाल्यानंतर ते ०७ जून १९९३ रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडे सोपविण्यात आले. [१]
शताब्दी वर्षात तत्त्वज्ञानासंदर्भात विविध उपक्रम राबविण्यासाठी अभ्यासकांची समिती स्थापन करण्याचा निर्णय उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.[२]
साने गुरुजी हे या केंद्राचे विद्यार्थी होते, त्यांनी येथे तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला.
इतिहास
संपादनया केंद्राचे इंग्लिश नाव "इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फिलॉसॉफी' (Indian Institute of Philosophy) आणि मराठीत "तत्त्वज्ञान मंदिर" असे होते. ही संस्था तिच्या स्थापनेपासून जागतिक दर्जाचे संशोधन केंद्र म्हणून उदयास आली. पुणे विद्यापीठाने जून १९७२ मध्ये या संस्थेचा कार्यभार स्वीकारला आणि नवीन नाव 'प्रताप तत्त्वज्ञान केंद्र' असे करण्यात आले.
या केंद्राचे विद्यमान नाव "तत्त्वज्ञानाचे प्रताप पदव्युत्तर संशोधन केंद्र, अमळनेर (Pratap P.G. Research Centre of Philosophy, Amalner)असे आहे. डॉ. अर्चना देगांवकर ह्या या केंद्राच्या प्रमुख आहेत.
जोडले गेलेले तत्त्ववेत्ते
संपादनप्रसिद्ध तत्त्ववेत्ते जी आर. मलकानी उर्फ घनशामदास रत्तनमल मलकानी हे या केंद्राचे पहिले संचालक होते. त्यानंतर प्रोफेसर रासबिहारीदास, प्रोफेसर कृष्णचंद्र भट्टाचार्य, प्रोफेसर भारतन कुमारप्पा, प्रोफेसर दे. दि. वाडेकर, प्रोफेसर टी. आर. व्ही. मूर्ती, प्रोफेसर दयाकृष्ण, प्रोफेसर दि. य. देशपांडे हे नामवंत तत्त्ववेत्ते या केद्राशी जोडले गेले.[३]
जोडले गेलेले साधक
संपादन- स्वामी कुवलयानंद[permanent dead link]
- महर्षी न्यायरत्न विनोद : तत्त्वज्ञान मंदिरात पीएचडी [४] आणि रिसर्च लेक्चरर [५]
उद्दिष्ट
संपादनप्रकाशन
संपादन"तत्त्वज्ञान मंदिर" आणि "फिलॉसॉफीकल क्वार्टरली" ही त्रैमासिके या संस्थेतून दीर्घकाळ प्रसिद्ध होत होत होती. पुणे विद्यापीठाने कार्यभार स्वीकारल्यानंतर ही प्रकाशने पुणे विद्यापीठाशी जोडली गेली. पुणे विद्यापीठाशी जोडले गेल्यावर "तत्त्वज्ञान मंदिर" हे परामर्श या नावाने प्रसिद्ध झाले तर "फिलॉसॉफीकल क्वार्टरली" हे "इंडियन फिलॉसॉफीकल क्वार्टरली" या नावाने प्रसिद्ध झाले. आता, जून १९९३ मध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने या केंद्राचा स्वीकार केल्यानंतर ही प्रकाशने पुन्हा पूर्वीच्याच नावाने प्रसिद्ध होत आहेत. [६]
इतर प्रकाशने
संपादनकेंद्राने ३२ पुस्तके प्रकाशित केली आहेत. [७]
- इंग्लिश : १७
- मराठी : १०
- हिंदी ०५
केंद्रासाठी विकास निधी
संपादनया केंद्राच्या विकासासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने ७५ लाखांचा निधी मंजूर केला आहे.[८]०१ एप्रिल २०१५ रोजी नूतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन कुलगुरू प्रा. सुधीर मेश्राम यांच्या हस्ते झाले.त्यासाठी ४८ लाख रुपये खर्च झाला. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून २५ लाख मंजूर झाले. [९]
फेसबुक पान
संपादनhttps://www.facebook.com/Pratap-Centre-of-Philosophy-Amalner-Maharashtra-1379804662291410/
हेही वाचा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ तत्त्वज्ञान केंद्राचे नुतनीकरण, महाराष्ट्र टाईम्स, http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik/-/articleshow/10920059.cms,०६[permanent dead link] जानेवारी २०१६ रोजी दुवा पाहिला.
- ^ तत्त्वज्ञानासाठी अभ्यासकांची समिती, सकाळ वृत्तसेवा, ०२ एप्रिल २०१५, http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5543122858218352252&SectionId=13&SectionName=%C3%A0%C2%A4%E2%80%B0%C3%A0%C2%A4%C2%A4%C3%A0%C2%A5%20%C3%A0%C2%A4%C2%A4%C3%A0%C2%A4%C2%B0 Archived 2016-03-05 at the Wayback Machine., ०६ जानेवारी २०१६ रोजी दुवा पाहिला.
- ^ Pratap P.G. Research Centre of Philosophy, Amalner, http://nmu.ac.in/rcp/en-us/home.aspx Archived 2013-12-02 at the Wayback Machine.
- ^ http://www.maharshivinod.org/content/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A5%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%A8
- ^ http://www.maharshivinod.org/node/12
- ^ तत्त्वज्ञान मंदिर, १९९७ खंड २ : अंक ३ व ४, संपादक : डॉ. अर्चना प्र. देगावंकर, प्रकाशक : डॉ. के. बी. पाटील, कुलसचिव,उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव,; मुद्रक : ईगल ऑफसेट
- ^ "संग्रहित प्रत" (PDF). 2020-09-18 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2016-01-06 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत". 2013-12-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-01-06 रोजी पाहिले.
- ^ तत्त्वज्ञान केंद्राचे नुतनीकरण, महाराष्ट्र टाईम्स, http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/jalgaon-north-maharashtra/philosophy/articleshow/46775384.cms[permanent dead link], ०६ जानेवारी २०१६ रोजी दुवा पाहिला