श्रीमंत प्रतापशेठ
श्रीमंत प्रतापशेठ (जन्म : ११ डिसेंबर १८७९, - २४ डिसेंबर १९६५[१] )हे अमळनेर (जिल्हा जळगाव) येथील दानशूर उद्योगपती होते. त्यांनी अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्था स्थापन केल्या. प्रताप तत्त्वज्ञान केंद्र ही त्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाची संस्था आहे.
चरित्र
संपादनप्रतापशेठ यांच्यावर लिहिलेले एकमेव चरित्र लेखन म्हणजे प्रताप तत्त्वज्ञान केंद्राचे पहिले संचालक तत्त्ववेत्ते जी आर. मलकानी उर्फ घनशामदास रतनमल मलकानी यांनी लिहिलेले A Life-sketch of Srimant Pratapseth: The Founder of the Indian Institute of Philosophy, Amalner and a Brief Account of the Advaitic System of Thought (१९५२) हे पुस्तक होय. [२] हा ग्रंथ डिजिटल स्वरूपात आणला आहे. [३]
स्मृति ग्रंथ
संपादनश्रीमंत प्रतापशेठ यांचे कार्य आणि कर्तृत्त्व; विशेषतः त्यांचे तत्त्वज्ञान या विषयाच्या विकासासाठीचे अथक प्रयत्न लक्षात घेऊन केंद्राचे पहिले संचालक तत्त्ववेत्ते जी आर. मलकानी यांनी ग्रंथ संपादित केला.[४]
- Srimant Pratapseth Amrut Mahostava Jubliee (Volume III) (Ed) G. R. Malkani
- श्रीमंत प्रतापशेठ अमृत महोत्सव गौरव ग्रंथ : संपादक : ओक भा. रा., चित्रशाळा प्रेस [५]
लेखन
संपादनश्रीमंत प्रतापशेठ यांनी दिलेल्या व्याख्यानावर आधारित तीन पुस्तके प्रताप तत्त्वज्ञान केंद्राने प्रकशित केली आहेत.[६]
- तत्त्वज्ञानावरील व्याख्याने (मराठी)
- तत्त्वज्ञान विषयक व्याख्यान (हिंदी)
- श्रीमंत प्रतापशेठजी की खासगी टिप्पणीयां (हिंदी)
श्रीमंत प्रतापशेठ यांचे छायाचित्र
संपादनसंदर्भ
संपादन- ^ मलपृष्ठ, तत्त्वज्ञान मंदिर, १९९७ खंड २ : अंक ३ व ४, संपादक : डॉ. अर्चना प्र. देगावंकर, प्रकाशक : डॉ. के. बी. पाटील, कुलसचिव,उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव,; मुद्रक : ईगल ऑफसेट
- ^ https://books.google.co.in/books/about/A_Life_sketch_of_Srimant_Pratapseth.html?id=eMUYAAAAIAAJ&redir_esc=y)
- ^ https://books.google.co.in/books/about/A_Life_sketch_of_Srimant_Pratapseth.html?id=eMUYAAAAIAAJ&redir_esc=y)
- ^ "संग्रहित प्रत" (PDF). 2020-09-18 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2016-01-06 रोजी पाहिले.
- ^ http://granthalaya.org/cgi-bin/koha/opac-detail.pl?biblionumber=662620
- ^ "संग्रहित प्रत" (PDF). 2020-09-18 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2016-01-06 रोजी पाहिले.