तटीय आंध्र
तटीय आंध्र किंवा कोस्टल आंध्र किंवा कोस्टा आंध्र हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील एक भौगोलिक प्रदेश आहे. विजयवाडा हे या प्रदेशातील सर्वात मोठे शहर आहे. उत्तरंध्र, रायलसीमा आणि तेलंगणा या प्रदेशाच्या सीमा आहेत. हे १९५३ पूर्वी मद्रास राज्याचा आणि १९५३ ते १९५६ पर्यंत आंध्र राज्याचा भाग होता. या क्षेत्रामध्ये आंध्र प्रदेशातील पूर्व घाट आणि बंगालच्या उपसागराच्या दरम्यान, ओडिशाच्या उत्तरेकडील सीमेपासून दक्षिणेकडील रायलसीमापर्यंतच्या किनारी जिल्ह्यांचा समावेश आहे.[१]
Region formed with coastal districts of Andhra Pradesh | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | administrative territorial entity of India | ||
---|---|---|---|
स्थान | आंध्र प्रदेश, भारत | ||
| |||
तटीय आंध्र हा शेतीसाठी उपयुक्त असा सुपीक प्रदेश आहे, ज्याला गोदावरी, कृष्णा आणि पेन्ना नद्यां पाणी पूरवतात. [२] तटीय आंध्रच्या समृद्धीचे श्रेय तिथल्या समृद्ध शेतजमिनी आणि या तीन नद्यांच्या मुबलक पाणीपुरवठ्याला देता येईल. भातशेतीत उगवलेले तांदूळ हे मुख्य पीक असून डाळी आणि नारळ हे देखील महत्त्वाचे आहे. मासेमारी उद्योगही या प्रदेशासाठी महत्त्वाचा आहे. [३]
संदर्भ
संपादन- ^ "Write short notes on the Northern Circars and the Coromandal Coast". 5 January 2011. 2022-08-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-06-15 रोजी पाहिले.
- ^ Rao, Desari Panduranga (1985). Trends in Indian Transport System: A Districtwise Study. Inter-India Publications. p. 158. ISBN 978-0-86590-701-0.
- ^ "Indian States fish production" (PDF).