तंग श्यावफिंग
(तंग श्यावफंग या पानावरून पुनर्निर्देशित)
तंग श्यावफिंग (मराठी लेखनभेद: दंग श्यावफंग ; चिनी: 邓小平 ; फीनयीन: Deng Xiaoping ;) (ऑगस्ट २२, इ.स. १९०४; क्वांगान, स-च्वान, चीन - फेब्रुवारी १९, इ.स. १९९७; पैचिंग, चीन) हा चिनी राजकारणी, साम्यवादी राजकीय तत्त्वज्ञ व मुत्सद्दी होता. चिनी साम्यवादी पक्षाचा सर्वोच्च नेता असताना, त्याने चिनाच्या जनता-प्रजासत्ताकाचा कल बाजारकेंद्रित अर्थव्यवस्थेकडे वळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तंग ची.ज.प्र.च्या राष्ट्राध्यक्षपदावर किंवा 'चिनी साम्यवादी पक्षाचा सर्वसाधारण सचिव' या चिनी राजकारणात सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या पदावर कधीही आरूढ नव्हता; तरीही इ.स. १९७८ ते इ.स. १९९२ या कालखंडात तो चिनाच्या जनता-प्रजासत्ताकाचा परमोच्च नेता होता.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- चायना बिझनेस वर्ल्ड.कॉम - तंग श्यावफिंग याचा जीवनपट (इंग्लिश मजकूर)