डल्ले खुर्सानी
डल्ले खुर्सानी किंवा अकबरे खुर्सानी, लाल चेरी मिरची किंवा फक्त डल्ले ही मिरचीची एक विशेष जात असून हीची प्रामुख्याने नेपाळ, भारतात सिक्कीम आणि पश्चिम बंगाल राज्यातील दार्जिलिंग आणि कालिम्पॉंग जिल्ह्यात लागवड केली जाते.[१] या मिरचीचा तिखटपणा १,००,००० आणि ३,५०,००० SHU ( स्कोव्हिल हीट युनिट्स) च्या दरम्यान आहे. ही हबनेरो मिरची सारखीच तिखट मानली जाते.[२] २०२० मध्ये, सिक्कीम राज्याला या मिरचीसाठी भौगोलिक मानांकन (GI) टॅग प्राप्त झाला. १४ सप्टेंबर २०२१ रोजी या मिरचीचा भौगोलिक मानांकन दार्जिलिंग आणि कालिम्पॉंग जिल्ह्यांपर्यंत वाढवण्यात आला.[३][४]
डल्ले खुर्सानी | |
---|---|
डल्ले खुर्सानी | |
प्रजाति | मिरची |
द्विनाम | Capsicum annum |
प्रकार | डल्ले खुर्सानी |
विपनन नाव | डल्ले खुर्सानी, अकाबरे खुर्सानी, लाल चेरी मिरची |
उगम | नेपाळ आणि भारत |
ही मिरची आकाराने गोल असून, नेपाळी भाषेत डल्ले खुर्सानी या नावाचा शब्दशः अर्थ 'गोल मिरची' असा होतो. नेपाळमध्ये, या मिरचीला अकबरे खुर्सानी (मिरचीचा राजा) किंवा जानमारा खुर्सानी (खुनी मिरची) असेही म्हणतात.[१][५]
वापर
संपादनचित्र दालन
संपादन-
डल्ले खुर्सानी/अकबरे खुर्सानी
-
कच्ची डल्ले खुर्सानी
-
पिकलेली डल्ले खुर्सानी
संदर्भ
संपादन- ^ a b "Dalle Khursani: Sikkim's Red Hot Chilli Pepper". Lonely Planet (इंग्रजी भाषेत). 2022-06-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-05-16 रोजी पाहिले.
- ^ a b "Dalle Khursani - When You Don't Feel Spicy Enough!". NDTV Food (इंग्रजी भाषेत). 2022-05-16 रोजी पाहिले.
- ^ "Chilli earns hill-district duo GI tag, honour for 'Dalle Khursani' belts". Telegraph India.
- ^ "One of the world's spiciest chillies — Sikkim's Dalle Khursani — to get GI tag". The Print.
- ^ "पिरो अकबरे खुर्सानीको गुलियो फाइदा :: शिलापत्र संवाददाता :: Shilapatra शिलापत्र - खबरको स्थायी ठेगाना". shilapatra.com. 2022-09-23 रोजी पाहिले.