भौगोलिक मानांकन
भौगोलिक सूचकांक मानांकन किंवा भौगोलिक संकेत (इंग्रजी:जीआय) हे एक विशिष्ट नाव किंवा चिन्ह आहे जे विशिष्ट भौगोलिक स्थान किंवा मूळ स्थान (उदा. एखादे स्थान,गाव, शहर, प्रदेश किंवा देश) यांचेशी संबंधित उत्पादनांसाठी वापरले जाते. भौगोलिक सूचकांकाचा वापर हा एखाद्या स्रोतास दर्शविण्यासाठी, एखाद्या प्रमाणपत्राच्या रूपात हे प्रमाणित करतो की, त्या उत्पादनात विशिष्ट गुणधर्म आहेत. तो तेथिल प्रचलीत पारंपारिक पद्धतींद्वारे बनविला गेला आहे किंवा त्याचे भौगोलिक स्थानामुळे त्यास विशिष्ठ प्रकारची प्रतिष्ठा आहे.
मूळ स्थानाचे नाव हे भौगोलिक सूचकांकाचा एक उपप्रकार आहे जिथे गुणवत्ता, पद्धत आणि त्या उत्पादनाची प्रतिष्ठा ही 'बौद्धिक संपत्ती अधिकार नोंदणी' अंतर्गत पारिभाषित केलेल्या निर्णायक क्षेत्रापासून बनविली जाते.
इतिहास
संपादनवेगवेगळ्या देशातील विविध सरकारे ही खाद्य उत्पादनांसाठी असलेली व्यावसायिक नावे (ट्रेड नेम) व व्यापार चिन्हे (ट्रेडमार्कस्) यांना एकोणिसावे शतकाच्या शेवटापासून संरक्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत.व्यापारात होत असलेला खोटेपणाचा व फसवेगिरीचा विरोध करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे कायदे केले आहेत. अशा परिस्थितीत, एखाद्या भौगोलिक सूचकांकाच्या मक्तेदारीला, ग्राहकांच्या फायद्यासाठी अथवा उत्पादकांच्या फायद्यासाठी ते सरकार प्रमाणित करते.
भारतातील व्यवस्था
संपादनजागतिक व्यापार संघटना (वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन) (डब्ल्यूटीओ)चा सदस्य म्हणून भारताने भौगोलिक संकेतांची (नोंदणी आणि संरक्षण) कायदा, १९९९ची रचना १५ सप्टेंबर २००३ पासून लागू केली आहे.ते जा.व्या.सं.च्या करारांतर्गत जीआयच्या अनुच्छेद २२ (१)च्या अंतर्गत त्याला पारिभाषित केले गेले आहे. बौद्धिक संपत्ती अधिकारांच्या व्यापार-संबंधित बाबींवर डब्ल्यूटीओ (टीआरआयपीएस) करार खालील प्रमाणे आहे: "सदस्य किंवा त्याचे आधिपत्याखालील प्रदेश किंवा क्षेत्रात उद्भवणाऱ्या चांगल्या गोष्टी या त्या स्थानाचा गुणविशेष म्हणून त्याची गुणवत्ता, प्रतिष्ठा किंवा चांगली वैशिष्ट्ये ही भौगोलिक सूचकांकाच्या उत्पत्तीसाठी आवश्यक आहे.
इतर माहिती
संपादनभौगोलिक सूचकांक मानांकन ही भारत सरकारतर्फे, उत्पादनांना त्याच्या दर्जानुसार व गुणवत्तेनुसार मानांकन देण्यासाठी राबविण्यात येणारी एक व्यवस्था आहे.हे मानांकन केंद्र सरकारच्या 'औद्योगिक धोरण व प्रोत्साहन' विभागातर्फे जारी करण्यात येते.
हे मानांकन एक प्रकारचे चिन्ह आहे जे, त्या उत्पादनाच्या मूळ भौगोलिक स्थानाकडे निर्देश करते. स्थानिक अथवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दरांवर त्याचा सकारात्मक परिणाम होते.याने त्या उत्पादनाची वेगळी ओळख निर्माण होते.
आजवर सुमारे २०० चे जवळपास भारतीय उत्पादनांना हे मानांकन देण्यात आलेले आहे.
महाराष्ट्रातील विविध मानांकनांची यादी
संपादन- सोलापुरी चादर व टॉवेल
- नागपुरी संत्री
- भिवापुरी मिरची
- पुणेरी पगडी
- कोकणचा हापूस आंबा[१]
- पैठणी साडी
- महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी[२]
- वारली चित्रकला
- कोल्हापुरी गुळ
- सांगलीची हळद[३]
- लासलगाव कांदा
- बीडचे सीताफळ
- डहाणूचा चिक्कू[४]
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "कोकण हापूसला भौगोलिक मानांकन". सकाळ. शनिवार, 6 ऑक्टोबर 2018. ८ ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ बेलोशे, रविकांत (शनिवार, 6 ऑक्टोबर 2018). "महाबळेश्वर स्ट्रॉबेरीला भौगोलिक राजमान्यता". सकाळ. ८ ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "सांगलीच्या हळदीला भौगोलिक मानांकन". डेली हंट. २८ जून २०१८. ८ ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले.
- ^ "डहाणूच्या चिकूला मिळाले भौगोलिक मानांकन". सामना. २८ जानेवारी २०१७. 2017-01-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ८ ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादन- http://www.ipindia.nic.in/registered-gls.htm याची नोंदणी करण्यासाठी असलेले भारत सरकारचे इंग्रजी संकेतस्थळ