ट्रेव्हर लायोनेल पेनी (१२ जून, १९६८:सॅलीसबरी, ऱ्होडेशिया - हयात) हा झिम्बाबेचा क्रिकेट खेळाडू आहे.

ट्रेव्हर याने मॅशोनालँड, वॉरविकशायर आणि बोलॅंडकडून एकूण १५८ प्रथम-श्रेणी, २९१ लिस्ट-अ आणि १५ ट्वेंटी२० सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात आयसीसी असोसिएट संघातर्फे खेळला.

ट्रेव्हर यांनी काही काळ किंग्ज पंजाब, डेक्कन चार्जर्स आणि कोलकाता नाईट रायडर्स ह्या इंडियन प्रिमीयर लीगच्या संघांचे प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. २०२१ आयपीएलच्या मोसमाआधी राजस्थान रॉयल्स संघाने ट्रेव्हर यांना प्रशिक्षकपदी नेमले.