टेकची मेरी (२६ मे, इ.स. १८६७:लंडन, इंग्लंड - २४ मार्च, इ.स. १९५३:लंडन, इंग्लंड) ही इंग्लंडच्या पाचव्या जॉर्जची पत्नी होती. या नात्याने ती युनायटेड किंग्डमची राणी आणि भारताची सम्राज्ञी होती. १९११च्या दिल्ली दरबारासाठी ती भारतात आली होती.

आठवा एडवर्ड आणि सहावा जॉर्ज हिची मुले होत. यांशिवाय तिला चार इतर अपत्ये होती.