टी. अंजय्या

भारतीय राजकारणी

टंगुटुरी अंजय्या (इ.स. १९२९ - ) हे भारत देशातील राजकारणी होते.ते ऑक्टोबर ११,इ.स. १९८० ते फेब्रुवारी २३,इ.स. १९८२ या काळात आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील सिकंदराबाद लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.त्याचप्रमाणे ते इ.स. १९७८ ते इ.स. १९८० या काळात राज्यसभेचे सदस्य होते.