टी.टी. कृष्णमचारी
तिरुवेल्लोर थत्तई कृष्णमचारी (तमिळ: திருவள்ளூர் தட்டை கிருஷ்ணமாச்சாரி; १८९९ - १९७४ ) हे भारतामधील काँग्रेस पक्षाचे एक नेते व जवाहरलाल नेहरूंच्या प्रशासनामध्ये १९५६-१९५८ आणि १९६४ - १९६६ दरम्यान भारताचे अर्थमंत्री होते. एका तमिळ अय्यंगार कुटुंबात जन्मलेल्या कृष्णमचारी यांनी मद्रास ख्रिश्चन कॉलेज येथून पदवी संपादन केली आणि तेथेच अर्थशास्त्र विभागात अध्यापन केले. ते टीटीके (TTK) या टोपणनावाने प्रसिद्ध होते. ड्राफ्टिंग कमिटीचे सदस्य, एक उद्योजक आणि काँग्रेसचे एक नेते म्हणून ते कार्यरत होते.
व्यावसायिक आयुष्य
संपादनकृष्णमचारी आधुनिक भारताच्या संस्थापकांपैकी एक होते. भारताच्या औद्योगिक विकासात त्यांचा मोलाचा वाटा होता. मूळात कृष्णमचारी व्यावसायिक होते. १९२८ साली चेन्नई येथे त्यांनी टी. टी. कृष्णमचारी आणि कंपनी नावाची कंपनी स्थापन केली. पुढे भरपूर यश मिळवलेली ही कंपनी आता 'टीटीके ग्रुप' नावाने ओळखली जाते. वयाच्या तिशीमध्ये कंपनीची व्यवस्थित घडी बसल्यावर कृष्णमचारींनी आपले लक्ष राजकारणाकडे वळवले. सुरुवातीला मद्रास विधानसभा क्षेत्रातून अपक्ष निवडून आल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.