झोरामथंगा ( १३ जुलै १९४४) हे भारत देशाच्या मिझोरम राज्यामधील एक राजकारणी व राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.

झोरामथंगा

विद्यमान
पदग्रहण
१५ मार्च २०१७
मागील पु ललथनहवला
कार्यकाळ
३ डिसेंबर १९९८ – ११ डिसेंबर २००८
मागील पु ललथनहवला
पुढील पु ललथनहवला

जन्म १३ जुलै, १९४४ (1944-07-13) (वय: ७९)
चंफाई जिल्हा, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष मिझो नॅशनल फ्रंट

१९६५ साली मिझो नॅशनल फ्रंट ह्या फुटीरवादी चळवळीचे सदस्य बनलेले झोरामथंगा ह्या चळवळीत सक्रिय १९६६ पासून सक्रीय होते. लवकरच अध्यक्ष लालडेंगा ह्यांनी झोरामथंगांची सचिव पदावर नियुक्ती केली. १९८६ साली भारत सरकार व मिझो नॅशनल फ्रंट दरम्यान शांतीकरार झाला व फ्रंटने आपली सशस्त्र चळवळ मागे घेतली. १९८७ साली मिझोरम राज्याची स्थापना झाली व मिझो नॅशनल फ्रंटला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली. लालडेंगांच्या १९९० मधील मृत्यूनंतर झोरामथंगा पक्षाचे अध्यक्ष बनले.

१९९८ सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमत मिळवून मिझो नॅशनल फ्रंट सत्तेवर आला व १९९८ ते २००८ दरम्यान झोरामथंगा मुख्यमंत्रीपदावर राहिले. २०१८ सालच्या विधानसभा निवडणुकीत मिझो नॅशनल फ्रंटने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा पराभव करून पुन्हा सत्ता मिळवली. २०१४ पासून हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक आहे.