झांबिया राष्ट्रीय फुटबॉल संघ

(झांबिया फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

झांबिया फुटबॉल संघ (फिफा संकेत: ZAM) हा आफ्रिकेमधील झांबिया देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आफ्रिकेतील सी.ए.एफ.चा सदस्य असलेला झांबिया सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ५०व्या स्थानावर आहे. आजवर झांबिया एकाही फिफा विश्वचषक तसेच फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धांसाठी पात्र ठरला नाही. झांबियाने २०१२ सालचा आफ्रिकन देशांचा चषक जिंकला होता तसेच १९७४ व १९९४ साली उपविजेतेपद मिळवले होते.

१९८८ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉल स्पर्धेमध्ये झांबियाने ग्वांगजू येथे इटलीवर ४-० असा आश्चर्यकारक विजय मिळवला होता.

बाह्य दुवे संपादन