ज्युलिया जिलार्ड
ज्युलिया आयलीन जिलार्ड (इंग्लिश: Julia Eileen Gillard; जन्मः २९ सप्टेंबर १९६१) ही ऑस्ट्रेलिया देशामधील एक राजकारणी व जून २०१० ते जून २०१३ दरम्यान देशाची पंतप्रधान होती. जिलार्डने २४ जून २०१० रोजी ऑस्ट्रेलियाच्या मजूर पक्षाचे नेतृत्वपद स्वीकारले आणि पंतप्रधानपदाची शपथ घेतली. ऑस्ट्रेलियाच्या इतिहासामधील जिलार्ड ही महिला पंतप्रधान होती. ३ वर्षे पंतप्रधानपदावर राहिल्यानंतर २६ जून २०१३ रोजी घेण्यात आलेल्या मजूर पक्षाच्या आंतरिक निवडणुकीमध्ये केव्हिन रुडने जिलार्डचा ५७ विरुद्ध ४५ अशा मतफरकाने पराभव केला व मजूर पक्षाचे नेतृत्व पटकावले. ही निवडणुक हरल्यास राजकारणामधून निवृत्त होऊ अशी घोषणा करणाऱ्या जिलार्डने पराजयानंतर पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला व केव्हिन रूडने ह्या पदाची सुत्रे स्वीकारली.
ज्युलिया जिलार्ड | |
ऑस्ट्रेलियाची २७वी पंतप्रधान
| |
कार्यकाळ २४ जून २०१० – २७ जून २०१३ | |
राणी | एलिझाबेथ दुसरी |
---|---|
मागील | केव्हिन रुड |
पुढील | केव्हिन रुड |
मजूर पक्षाची पक्षनेती
| |
कार्यकाळ २४ जून २०१० – २६ जून २०१३ | |
मागील | केव्हिन रुड |
पुढील | केव्हिन रुड |
ऑस्ट्रेलियाची उप-पंतप्रधान
| |
कार्यकाळ ३ डिसेंबर २००७ – २४ जून २०१० | |
पंतप्रधान | केव्हिन रुड |
संसद सदस्य
| |
विद्यमान | |
पदग्रहण ३ ऑक्टोबर १९९८ | |
जन्म | २९ सप्टेंबर, १९६१ बॅरी, युनायटेड किंग्डम |
राजकीय पक्ष | मजूर पक्ष |
सही |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |