ज्युलिया जिलार्ड

(ज्युलिया आयलीन जिलार्ड या पानावरून पुनर्निर्देशित)

ज्युलिया आयलीन जिलार्ड (इंग्लिश: Julia Eileen Gillard; जन्मः २९ सप्टेंबर १९६१) ही ऑस्ट्रेलिया देशामधील एक राजकारणी व जून २०१० ते जून २०१३ दरम्यान देशाची पंतप्रधान होती. जिलार्डने २४ जून २०१० रोजी ऑस्ट्रेलियाच्या मजूर पक्षाचे नेतृत्वपद स्वीकारले आणि पंतप्रधानपदाची शपथ घेतली. ऑस्ट्रेलियाच्या इतिहासामधील जिलार्ड ही महिला पंतप्रधान होती. ३ वर्षे पंतप्रधानपदावर राहिल्यानंतर २६ जून २०१३ रोजी घेण्यात आलेल्या मजूर पक्षाच्या आंतरिक निवडणुकीमध्ये केव्हिन रुडने जिलार्डचा ५७ विरुद्ध ४५ अशा मतफरकाने पराभव केला व मजूर पक्षाचे नेतृत्व पटकावले. ही निवडणुक हरल्यास राजकारणामधून निवृत्त होऊ अशी घोषणा करणाऱ्या जिलार्डने पराजयानंतर पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला व केव्हिन रूडने ह्या पदाची सुत्रे स्वीकारली.

ज्युलिया जिलार्ड

ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलियाची २७वी पंतप्रधान
कार्यकाळ
२४ जून २०१० – २७ जून २०१३
राणी एलिझाबेथ दुसरी
मागील केव्हिन रुड
पुढील केव्हिन रुड

मजूर पक्षाची पक्षनेती
कार्यकाळ
२४ जून २०१० – २६ जून २०१३
मागील केव्हिन रुड
पुढील केव्हिन रुड

ऑस्ट्रेलियाची उप-पंतप्रधान
कार्यकाळ
३ डिसेंबर २००७ – २४ जून २०१०
पंतप्रधान केव्हिन रुड

संसद सदस्य
विद्यमान
पदग्रहण
३ ऑक्टोबर १९९८

जन्म २९ सप्टेंबर, १९६१ (1961-09-29) (वय: ६३)
बॅरी, युनायटेड किंग्डम
राजकीय पक्ष मजूर पक्ष
सही ज्युलिया जिलार्डयांची सही