जोपुळ (दिंडोरी)
जोपुळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एक गाव आहे.
?जोपुळ (पाटील बाबांचे) महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | दिंडोरी |
जिल्हा | नाशिक जिल्हा |
लोकसंख्या • घनता |
४,००० (४०००) (२०२१) • त्रुटि: "☺️" अयोग्य अंक आहे/किमी२ |
भाषा | मराठी |
सरपंच | सौ. चंद्रकला जाधव
उपसरपंच:- श्री. माधव दादा उगले |
बोलीभाषा | |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड |
• ४२२२०९ • एमएच/१५ |
भौगोलिक स्थान
संपादनदिंडोरी तालुक्यात पालखेड धरणाच्या पूर्व भागात पिंपळगाव बसवन्त च्या पश्चिम भागात, नाशिक शहरापासून उत्तरेस 30 किमीवर जोपुळ गाव आहे.
हवामान
संपादनथंड हवामान प्रदेश मुबलक पाण्याची उपलब्धता
लोकजीवन
संपादनजोपुळ गावात प्रामुख्याने सर्वच हिंदू धर्मीय लोक असून मराठा, तसेच आदिवासी समुदायाची संख्या जास्त आहे. जोपुळ गावातील लोक 80% शेती आणि शेतीशी निगडित व्यवसायांवर अवलंबुन आहेत.
प्रेक्षणीय स्थळे
संपादनजोपुळ येथे गावाच्या दक्षिणेस प्रसिद्ध संत पाटील बाबा महाराज समाधी मंदिर आहे. हे वारकरी संप्रदायाचे एक प्रमुख केंद्र आहे. संत पाटील बाबांनी निवृत्तीनाथ महाराज समाधी त्रंबकेशवर चा शोध लावला. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा प्रसार करण्यात त्यांचा सिहाचा वाटा आहे. पाटील बाबांनी बांधलेले पुरातन विठ्ठल मंदिर व या महिन्यात भाद्रपद महिन्यातिल 181 वर्ष जुना हरिनाम सप्ताह लोकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. नाशिक जिल्ह्यातील त्रम्बकेशवर नंतरचे जोपुळ हे दुसरे सर्वात मोठे वारकरी सांप्रदायिक केंद्र आहे. जोपुळ गावात पुरातन जागृत श्री खंडेराव महाराज देवस्थान आहे. चैत्र पौर्णिमेला गावात भरणाऱ्या यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येतात. नाशिक जिल्ह्यातील मोठ्या प्रमुख खंडोबा देवस्थानांमध्ये जोपुळच्या खंडोबाची गणती होते.
नागरी सुविधा
संपादनगावातील रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. पाणी मुबलक असून नागरी सुविधा चांगल्या आहेत.
जवळपासची गावे
संपादनचिंचखेड जउळकेवणी लोखंडेवाडी मातेरेवाडी खडकसुकेणे बोपेगाव चिंचखेड पिंपळगाव बसवंत (निफाड)