जोग धबधबा
जोग धबधबा हा भारताच्या कर्नाटक राज्यामधील एक धबधबा आहे. हा धबधबा शिमोगा जिल्ह्यात शरावती नदीवर स्थित असून तो दक्षिण आशियातील सर्वात उंच नैसर्गिक धबधबा आहे. त्याची उंची २९२ मीटर्स आहे. तो जगातील १००१ नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक आहे.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |