जॉर्डनचा तलाल

१९५१ ते १९५२ पर्यंत जॉर्डनचा राजा

तलाल इब्न अब्दुल्ला (लेखनभेद: तलाल इब्न अब्दल्ला ; अरबी: طلال بن عبد الله ; रोमन लिपी: Talal I bin Abdullah ;) (२६ फेब्रुवारी, इ.स. १९०९ - ७ जुलै, इ.स. १९७२) हा जॉर्डनाचा दुसरा राजा होता. याने २० जुलै, इ.स. १९५१ ते ११ ऑगस्ट, इ.स. १९५२ या कालखंडात सिंहासनस्थ होता. याच्या अल्प कारकिर्दीत जॉर्डनाच्या हाशेमी राज्याची आधुनिक व उदारमतवादी राज्यघटना बनवली गेली. प्रकृतिअस्वास्थ्यामुळे (वृत्तांनुसार छिन्नमनस्कतेमुळे[]) याला राजेपदावरून पायउतार व्हावे लागले. याच्यानंतर याचा मुलगा हुसेन राजा बनला.

जॉर्डनचा तलाल

तलालाचा जन्म अब्दुल्ला व त्याची पहिली पत्नी मुस्बा बिंती नासर यांच्या पोटी २६ फेब्रुवारी, इ.स. १९०९ रोजी तत्कालीन ओस्मानी साम्राज्यात मोडणाऱ्या मक्केत झाला. त्याचे सैनिकी शिक्षण रॉयल मिलिटरी अकॅडमी ऑफ सॅंडहर्स्ट या ब्रिटिश सैन्यप्रशिक्षण विद्यालयात झाले. इ.स. १९२९ साली पदवी मिळवल्यानंतर तो अल-जैश अल-अरबी सैन्याच्या घोडदळात द्वितीय लेफ्टनंट पदावर रुजू झाला.

जॉर्डनाचा राजा असलेला त्याचा पिता पहिला अब्दुल्ला याचा जेरूसालेम येथे खून झाल्यानंतर तलाल सिंहासनावर बसला. याच्या अल्प कारकिर्दीत जॉर्डनाच्या हाशेमी राजतंत्राची आधुनिक व उदारमतवादी राज्यघटना रचली गेली. या राज्यघटनेद्वारे सामुदायिक पातळीवर जॉर्डेनियन शासन व वैयक्तिक पातळीवर मंत्री जॉर्डेनियन संसदेस जबाबदार ठरले. १ जानेवारी, इ.स. १९५२ रोजी ही नवी राज्यघटना संमत होऊन स्वीकारण्यात आली.

संदर्भ

संपादन
  1. ^ "जॉर्डन: स्किझोफ्रेनिया (जॉर्डन: छिन्नमनस्कता)" (इंग्लिश भाषेत). 2013-08-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-08-25 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे

संपादन