जॉन स्ट्रट

भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेता शास्त्रज्ञ.
(जॉन विल्यम स्टूट रॅले या पानावरून पुनर्निर्देशित)

जॉन स्ट्रट हे शास्त्रज्ञ होते. जॉन विल्यम स्ट्रट, रेलेचा ३रा बॅरन (इंग्लिश: John William Strutt, 3rd Baron Rayleigh ;) (१२ नोव्हेंबर, इ.स. १८४२; लॅंगफर्ड ग्रोव्ह, इसेक्स, इंग्लंड - ३० जून, इ.स. १९१९; टर्लिंग प्लेस, इसेक्स, इंग्लंड) हा इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ होते.

जॉन स्ट्रट

पूर्ण नावजॉन स्ट्रट
जन्म १२ नोव्हेंबर, इ.स. १८४२
लॅंगफर्ड ग्रोव्ह, इसेक्स, इंग्लंड
मृत्यू ३० जून, इ.स. १९१९
टर्लिंग प्लेस, इसेक्स, इंग्लंड
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्र
पुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

संशोधन

संपादन

आकाशाच्या निळ्या रंगाचे कारण असलेल्या व आता रेले विकिरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घटनेचा शोध त्याने लावला. तसेच आता रेले तरंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पृष्ठ तरंगांच्या अस्तित्वाचे भाकीतही त्याने वर्तवले. त्याने लिहिलेले द थिअरी ऑफ साउंड (अर्थ: ध्वनीचा सिद्धांत) हे पुस्तक ध्वानिकी अभियंते आजही संदर्भग्रंथ म्हणून वापरतात.

पुरस्कार

संपादन

विल्यम रॅम्से याच्यासह आरगॉन या मूलद्रव्याचा शोध लावल्यामुळे त्याला इ.स. १९०४ साली नोबेल पारितोषिक देण्यात आले.

बाह्य दुवे

संपादन
  • "जॉन स्ट्रट याचा अल्पपरिचय" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)