जेमिनी वेधशाळा
जेमिनी वेधशाळा ही एक खगोलीय वेधशाळा आहे ज्यामध्ये ८.१९ मी व्यासाच्या हवाई, युएस आणि सेर्रो पाचोन, चिले येथील जेमिनी उत्तर आणि जेमिनी दक्षिण या दोन दुर्बिणी आहेत. उत्तर आणि दक्षिण गोलार्धातील दोन दुर्बिणी एकत्रितपणे संपूर्ण आकाश व्यापतात. या दुर्बिणी खगोलशास्त्रज्ञांसाठी सध्या उपलब्ध असणाऱ्या सर्वात आधुनिक आणि मोठ्या दुर्बिणींपैकी एक आहेत. जेमिनी दुर्बिणींची बांधणी आणि रचना युनायटेड स्टेट्स, कॅनडा, चिले, ब्राझील आणि अर्जेंटिना या देशांच्या संघटनेने केली. सध्या असोसिएशन ऑफ युनिव्हर्सिटीज फॉर रिसर्च इन ॲस्ट्रॉनॉमी (ऑरा) ही संस्था जेमिनी वेधशाळा चालवते.
जेमिनी वेधशाळा | |
हवाईमधील जेमिनी उत्तर आणि चिलेतील जेमिनी दक्षिण | |
संस्था | जेमिनी कन्सोर्टिअम आणि असोसिएशन ऑफा युनिव्हर्सिटीज फॉर रिसर्च इन ॲस्ट्रॉनॉमी |
---|---|
स्थळ | मौना किया, हवाई, युएस सेर्रो पाचोन, चिले |
निर्देशांक | 19°49′26″N 155°28′11″W / 19.82396°N 155.46984°W 30°14′27″S 70°44′12″W / 30.24073°S 70.73659°W |
उंची | ४,२१३ मी (१३,८२२ फूट) २,७२२ मी (८,९३० फूट) |
तरंगलांबी | दृश्य, निकट अवरक्त |
स्थापना | २००० |
दूरदर्शक श्रेणी | कॅसिग्रेन परावर्तक |
व्यास | ८.१ मी (२७ फूट) प्रत्येकी[१] |
माऊंट | अल्टाझिमुथ |
संकेतस्थळ | www |
संदर्भ
संपादन- ^ "जेमिनी दुर्बिणी, विज्ञान आणि तंत्रज्ञान" (इंग्रजी भाषेत). 2013-04-22 रोजी पाहिले.