जॅक्सन पोलॉक
जॅक्सन पोलॉक (इंग्लिश: Jackson Pollock) (जानेवारी २८, इ.स. १९१२ - ऑगस्ट ११, इ.स. १९५६) हा एक अमेरिकन चित्रकार होता. अमूर्त अभिव्यक्तिवादी चित्रशैलीमध्ये त्याचे योगदान मौल्यवान मानले जाते. विक्षिप्त व खाजगी स्वभावाच्या व मद्यपानाच्या आहारी गेलेल्या पोलॉकला त्याच्या कारकिर्दीत पुष्कळ प्रसिद्धी व बदनामी मिळाली.
जॅक्सन पोलॉक Jackson Pollock | |
---|---|
जन्म |
पॉल जॅक्सन पोलॉक जानेवारी २८, इ.स. १९१२ कोडी, वायोमिंग, अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
मृत्यू |
ऑगस्ट ११, इ.स. १९५६ स्प्रिंग्ज, न्यू यॉर्क |
राष्ट्रीयत्व | अमेरिकन |
पेशा | चित्रकार |
स्वाक्षरी |
कॅनव्हासावर रंग ओतून चित्रे बनवण्याच्या शैलीमध्ये पोलॉकने नैपुण्य मिळवले होते. इ.स. १९४८ साली त्याने रेखाटलेले क्रमांक ५ ह्या चित्राचे मूल्य सध्या १५.६८ कोटी अमेरिकन डॉलर इतके असून, ते जगातील सर्वांत महागडे चित्र मानले जाते.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत