जुआन वेलास्केस त्लाकोत्सिन

जुआन वेलास्केस त्लाकोत्सिन हा मॉतेक्सुमा, दुसरा आणि कुआव्तेमोक ह्यांचा चिवाकोआत्ल (सल्लागार) होता. तो चिवाकोआत्ल त्लाकेलेलत्सिनचा नातू होता.

त्लाकोत्सिन एर्नान कोर्तेझकडून पकडला गेला होता, त्यानंतर राजकुटूंबाचा राजेशाही खजिना आणि सोने कुठे ठेवले आहे हे, माहित करून घेण्यासाठी त्याचा कुआव्तेमोकबरोबर छळ करण्यात आला. सम्राट कुआव्तेमोकच्या देहांत शासनानंतर त्यास कुआव्तेमोकनंतरचा अस्तेक त्लातोआनी म्हणून निवडण्यात आले. कुआव्तेमोकच्या देहांत शासनानंतर कोर्तेझने त्लाकोत्सिनला स्पॅनियार्डांप्रमाणे वेश परिधान करण्यास सांगून त्याचा त्लातोआनी बनल्याबद्दल अभिनंदनपर त्यास एक तलवार आणि पांढरा घोडा दिला. तो स्पॅनिश अंमलाखाली (१५२५-१५२६) अस्तेक बाहुला राज्यकर्ता बनला. त्याचा डॉन जुआन वेलास्केस त्लाकोत्सिन ह्या नावाने बाप्तिस्मा (नवे नाव देण्याचा विधी) करण्यात आला. नंतर त्याने तीन वर्षे कोर्तेझच्या स्वारीत त्यास साथ दिली. तो १५२६ (८ ससा) मध्ये तेनोच्तित्लानला येण्यापूर्वीच नोचिक्स्तलानमध्ये काही अज्ञात कारणाने मृत्यू पावला. त्याच्या मृत्यूनंतर कोर्तझने लगेच डॉन आंद्रेस दि तापिया मोतेल्च्यूस त्याचा नंतरचा राज्यकर्ता म्हणून निवडले.

संदर्भ

संपादन
मागील
माल्तात्झिंकात्झिन
चिवाकोआत्ल
१५२०–१५२५
पुढील
कोणीही नाही
मागील
कुआव्तेमोक
तेनोच्तित्लानचा ट्लाटोवानी
१५२५–१५२६
पुढील
आंद्रेस दि तापिया मोतेल्च्यू