अस्तेक दिनदर्शिका

ॲझ्टेक संस्कृती मधील दिनदर्शिका

ऍझ्टेक दिनदर्शिका ही ऍझ्टेक आणि मध्य मेक्सिकोमधील प्री-कोलंबियन संस्कृतीतील जमाती दिनदर्शिका म्हणून वापरीत. प्राचीन मेसोअमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या काही मेसोअमेरिकन दिनदर्शिकांपैकी ही एक आहे.

ऍझ्टेक दिनदर्शिका

ह्या दिनदर्शिकेत ज्याला क्स्युपोवाली ("वर्ष मोजणी") म्हणत असे ३६५ दिवसांचे दिनदर्शिका चक्र आणि ज्यास टोनाल्पोवाली ("दिवस मोजणी") म्हणत असे २६० दिवसांचे धार्मिक चक्र अशी दोन चक्रे असत. ही दोन्ही चक्रे एकाच वेळी सुरू असतात. ३६५ दिवसांच्या ५२ वर्षांनंतर येणाऱ्या दिवसाला शतकाचा किंवा दिनदर्शिका चक्राचा पहिला दिवस म्हणत.

टोनाल्पोवाली

संपादन

२६० दिवसांच्या चक्रासाठी टोनाल्पोवाली ("दिवस मोजणी") ही संज्ञा आहे. प्रत्येक दिवसाची तारीख एक ते तेरा यांपैकी एक आकडा आणि दिवसांच्या २० चिन्हांपैकी एक असे दोन घटक मिळून दर्शवितात. दर दिवशी आकडा एकने वाढतो आणि पुढचे चिन्ह येते. 'एक मगर', त्यानंतर 'दोन वारा', 'तीन घर', 'चार सरडा', असे होत होत शेवटी 'तेरा वेत' ही तारीख येते. तेराव्या वेत या चिन्हानंतरचे चौदावे चिन्ह बिबट्या. म्हणून पुढची तारीख 'एक बिबट्या'. पुढची 'दोन गरुड' आणि शेवटची विसावी 'सात पुष्प'. चिन्हे संपली. त्यामुळे त्यानंतर पुढचा आकडा आणि पहिल्या चिन्हापासून म्हणजे 'आठ मगर" पासून पुढे चक्र सुरू राहते आणि पुढेपुढे जात रहाते. २० चिन्हे आणि १३ आकडे ह्यांच्या चक्राचे पूर्ण २६० दिवस (१३×२०) झाले की पुन्हा 'एक मगर' पासून सुरुवात होते.

दिवस चिन्हे

संपादन

इतर मेसोअमेरिकन दिनदर्शिका, मुख्यत्वे मिक्सटेक्सांकडून वापरली जाणारी चिन्हे आणि ऍझ्टेक दिवस चिन्हांत दाखवलेले प्राणी किंवा वस्तू यांत बरेच साम्य आहे.

दिवस चिन्हांची चित्रे काही अझ्टेक ग्रंथात दिली आहेत, तर काही मोठ्या दगडांवर कोरलेली आहेत. कोडेक्स मॅग्लियाबेचियानो वरून घेतलेली काही चिन्हे अशी:

Image नाहुआट्ल नाव उच्चार (IPA) मराठी भाषांतर दिशेचे अधिपत्य
  सिपाक्टली [siˈpaktɬi] मगर
ऍलिगॅटर (Alligator)
कैमान (Caiman)
मगरसदृश राक्षसी प्राणी
पूर्व
  एहेकाट्ल [eʔˈeːkatɬ] वारा उत्तर
  काली [ˈkalli] घर पश्चिम
  केट्झपालीन [kʷetsˈpalin] सरडा दक्षिण
  कोआट्ल [ˈkoː(w)aːtɬ] साप पूर्व
  मिकिझ्टली [miˈkistɬi] मृत्यू उत्तर
  माझाट्ल [ˈmasaːtɬ] मृग पश्चिम
  टोच्टली [ˈtoːtʃtɬi] ससा दक्षिण
  ऍट्ल [aːtɬ] जल पूर्व
  इट्झकिंट्ली [itsˈkʷintɬi] श्वान North
  ओझोमाट्ली
ओझोमाहट्ली
[osoˈmaʔtɬi] मर्कट पश्चिम
Image नाहुआट्ल नाव उच्चार (IPA) मराठी भाषांतर दिशेचे अधिपत्य
  मालिनाली [maliːˈnalli] गवत दक्षिण
  अकाट्ल [ˈaːkatɬ] वेत पूर्व
  ओसेलोट्ल [oˈseːloːtɬ] बिबट्या उत्तर
  क्वाहट्ली
कुऔहट्ली
[ˈkʷaːwtɬi] गरूड पश्चिम
  कोझ्काक्वाहट्ली
कोझ्काकुऔहट्ली
[koːsaˈkʷaːwtɬi] गिधाड दक्षिण
  ओलिन [ˈoliːn] हालचाल
कंप
भूकंप
पूर्व
  टेक्पाट्ल [ˈtekpatɬ] गारगोटी
गारगोटीची सुरी
उत्तर
  क्याहुइट्ल [kiˈ(j)awitɬ] पर्जन्य पश्चिम
  क्सोच्टिट्ल
क्षोच्टिट्ल
[ʃoːtʃitɬ] पुष्प दक्षिण

एहेकाट्ल आणि ट्लालोक ह्या देव अनुक्रमे वारा आणि पाऊस ह्यांच्याची संबंधित असल्याने वारा आणि पाऊस ह्यांना त्यांची चिन्हे दिली आहेत.

त्रेचेना

संपादन

१३ अंकांच्या दिवसांच्या संचास त्रेचेना ही स्पॅनिश संज्ञा वापरली जाते (त्रेचे = "तेरा"). २६०-दिवस चक्रातील प्रत्येक २० त्रेचेना कुठल्यातरी देवदेवतांशी संबंधित असे.

त्रेचेना देव
१ मगर – १३ वेत ओमेटेओट्लl
१ जाग्वार – १३ मृत्यू क्वेटझालकोआट्ल
१ मृग – १३ पर्जन्य टेपेयोलोट्ल
१ पुष्प – १३ गवत ह्युह्युकोयोट्ल
१ वेत – १३ सर्प चल्च्युहट्लीक्यु
१ मृत्यू – १३ वेत टोनाट्युह
१ पर्जन्य – १३ मर्कट ट्लालोक
१ गवत – १३ सरडा मायाह्युल
१ सर्प – १३ कंपन (कंप) क्स्युहटेक्युहट्ली
१ वेत – १३ श्वान मिक्टलानटेक्युहट्ली
त्रेचेना देव
१ मर्कट – १३ घर पाटेकाट्ल
१ सरडा – १३ गिधाड इट्झट्लाकोल्युक्वी
१ कंपन – १३ जल ट्लाझोल्टेओट्ल
१ श्वान – १३ वारा क्सिपे टोटेक
१ घर – १३ गरूड इट्झ्पापालोट्ल
१ गिधाड – १३ ससा क्सोलोट्ल
१ जल – १३ मगर चाल्च्युहटोटोलीन
१ वारा – १३ बिबट्या चांटिको
१ गरूड – १३ मृग क्सोचिक्वेट्झाल
१ ससा – १३ पुष्प क्स्युहटेक्युहट्ली

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन