जिरिबाम
मणिपूरमधील शहर
जिरिबाम हे भारताच्या मणिपूर राज्याच्या जिरिबाम ह्याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. मणिपूरचे प्रवेशद्वार समजले जाणारे जिरिबाम मणिपूर राज्याच्या पश्चिम भागात आसाम राज्याच्या सीमेवर स्थित असून ते राजधानी इम्फाळपासून सुमारे २२० किमी अंतरावर आहे. २०११ साली जिरिबामची लोकसंख्या ७,३४३ होती. मणिपुरी व बांग्ला ह्या येथील प्रमुख भाषा आहेत.
मणिपूरमधील शहर | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | मानवी वसाहती | ||
---|---|---|---|
स्थान | पूर्व इंफाळ जिल्हा, मणिपूर, भारत | ||
| |||
जिरिबाम জিরিবাম |
|
भारतामधील शहर | |
देश | भारत |
राज्य | मणिपूर |
जिल्हा | जिरिबाम |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | ७,३४३ |
प्रमाणवेळ | यूटीसी+०५:३० (भारतीय प्रमाणवेळ) |
जिरिबाम रेल्वे स्थानक हे मणिपूर राज्यामधील सर्वात पहिले रेल्वे स्थानक असून ते भारतीय रेल्वेच्या उत्तर पूर्व सीमा रेल्वे क्षेत्राच्या अखत्यारीत येते. येथून सिलचरसाठी पॅसेंजर रेल्वे धावते. जिरिबाम-इम्फाळ रेल्वेमार्गाचे काम सुरू असून डिसेंबर २०२३ मध्ये हा मार्ग वाहतूकीसाठी खुला होईल.