जियोव्हानी पिको देल्ला मिरांदोला

जियोव्हानी पिको दै काँती देल्ला मिरांदोला ए देल्ला काँकोर्दिया , योहानेस पिकस दे मिरांदुला तथा पिको देल्ला मिरांदोला (२४ फेब्रुवारी, १४६३ - १७ नोव्हेंबर, १४९४) हे पंधराव्या शतकातील इटलीमधील रिनैसाँ काळातील जहागीरदार आणि तत्त्वज्ञ होते. [] १४८६ साली वयाच्या २३व्या वर्षी त्यांनी धर्म, तत्त्वज्ञान, नैसर्गिक तत्त्वज्ञान आणि जादू या विषयांवरील ९०० लेखांच्या बाजूने लिहिण्याचे व बोलण्याचे ठरवले. या संदर्भात त्यांनी मनुष्याच्या प्रतिष्ठेवर भाषण लिहिले. याला "रिनैसाँ जाहीरनामा" समजले जाते, [] [] ही ९०० लेख असलेले हे पुस्तक कॅथोलिक चर्चने सार्वत्रिकपणे बंदी घातलेले पहिले छापील पुस्तक होते. पिकोला कधीकधी आद्य-प्रोटेस्टंट म्हणले जाते कारण त्याच्या लेखांमध्ये त्याने अनेक वर्षांनी आलेल्या प्रोटेस्टंट विचारांचा अंदाज लावला होता. []

नोव्हेंबर १४८४मध्ये मिरांदोला फिरेंझे शहरात रहायला गेला. तेथे लॉरेंझो दे मेदिचीने त्याला तहहयात आश्रय दिला.

लॉरेंझोच्या मृत्यूनंतर फिरेंझेवर गिरोलामो साव्होरानोलाने वर्चस्व मिळवले. मिरांदोलाचा कल त्याच्या बाजूने झाला होता व कदाचित त्याचमुळे मिरांदोलाच्या सचिवानेचे त्याला विषप्रयोग करून मारले असावे.[] त्याच्याच बरोबर त्याच मित्र असलेला पोलिझियानोचाही मृत्यू झाला.[] या मृत्यूंच्या मागे लॉरेंझोचा मुलगा पिएरोचा हात असल्याचाही समज आहे.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Pico della Mirandola, Giovanni, Conte" in Grolier Encyclopedia of Knowledge, volume 15, copyright 1991. Grolier Inc., आयएसबीएन 0-7172-5300-7
  2. ^ Oration on the Dignity of Man (1486) wsu.edu Archived 2011-01-04 at the Wayback Machine.
  3. ^ Heiser, James D., Prisci Theologi and the Hermetic Reformation in the Fifteenth Century, Malone, TX: Repristination Press, 2011. आयएसबीएन 978-1-4610-9382-4
  4. ^ "Philip Schaff: History of the Christian Church, Volume VI: The Middle Ages. A.D. 1294-1517 - Christian Classics Ethereal Library". www.ccel.org. 2021-12-23 रोजी पाहिले.
  5. ^ Ben-Zaken, Avner, "Defying Authority, Rejecting Predestination and Conquering Nature", in Reading Hayy Ibn-Yaqzan: A Cross-Cultural History of Autodidacticism (Johns Hopkins University Press, 2011), 65–101.
  6. ^ Ben-Zaken, Avner, "Defying Authority, Rejecting Predestination and Conquering Nature", in Reading Hayy Ibn-Yaqzan: A Cross-Cultural History of Autodidacticism (Johns Hopkins University Press, 2011), 65–101.
  7. ^ Malcolm Moore (7 February 2008). "Medici philosopher's mysterious death is solved" The Daily Telegraph (London, UK). Accessed June 2013.