जावा समुद्र (इंडोनेशियन भाषा: Laut Jawa, लाउत जावा;) हा इंडोनेशियाजवळचा उथळ समुद्र आहे. सुंदा महासागरीय पठारवर असलेल्या या समुद्राचे क्षेत्रफळ सव्वा तीन लाख किमी आहे. हा समुद्र शेवटच्या हिमयुगाच्या शेवटीशेवटी समुद्रपातळी वाढल्यावर अस्तित्वात आला[]. याच्या उत्तरेला बॉर्नियो, दक्षिणेस जावा बेट, पश्चिमेस सुमात्रा तर पूर्वेस सुलावेसी आहे. वायव्येस असलेल्या करिमाताच्या सामुद्रधुनीनिशी हा समुद्र दक्षिण चीनी समुद्रास मिळतो.

जावा समुद्राचा नकाशा

संदर्भ

संपादन
  1. ^ "प्लाइस्टोसीन सी लेव्हल मॅप्स" (इंग्लिश भाषेत). 2007-04-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-02-13 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)