जस्टिन त्रूदो

२०१५ पासून कॅनडाचे २३ वे पंतप्रधान

जस्टिन पेरी जेम्स त्रूदो (फ्रेंच: Justin Pierre James Trudeau; २५ डिसेंबर १९७१) हा कॅनडा देशातील एक राजकारणी व लिबरल पार्टी ऑफ कॅनडा ह्या राजकीय पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. जस्टिन हा कॅनडाचा भूतपूर्व पंतप्रधान पिएर त्रूदोमार्गारेट ट्रुडो ह्यांचा जेष्ठ पुत्र आहे. जस्टिन पापिन्यू मतदारसंघातून २००८ मध्ये खासदार म्हणून पहिल्यांदा निवडून आला आणि २०११ मध्ये तो पुन्हा खासदार म्हणून निवडून आला. लिबरल पार्टीच्या नागरिकत्व, परदेशी नागरिकांचे स्थलांतरण, उच्च माध्यमिक शिक्षण, खेळ याविषयी असलेल्या राजकीय विचारांचा तो टीकाकार आहे. १४ एप्रिल २०१३ रोजी तो लिबरल पार्टी ऑफ कॅनडाचे अध्यक्ष बनला.

जस्टिन त्रूदो

कॅनडा ध्वज कॅनडाचा २३वा पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
ठरायचे आहे
राणी एलिझाबेथ दुसरी
मागील स्टीफन हार्पर

लिबरल पक्षाचा अध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
१४ एप्रिल २०१३

कॅनडा संसद सदस्य
विद्यमान
पदग्रहण
१४ ऑक्टोबर २००८
मतदारसंघ पापिन्यू

जन्म २५ डिसेंबर, १९७१ (1971-12-25) (वय: ५३)
ओटावा, ऑन्टारियो, कॅनडा
राजकीय पक्ष कॅनडाची लिबरल पार्टी
निवास मॉंत्रियाल
धर्म रोमन कॅथलिक

ऑक्टोबर २०१५ मध्ये कॅनडात घेण्यात आलेल्या सांसदीय निवडणुकीमध्ये त्रूदोच्या लिबरल पक्षाने ३३८ जागांपैकी १८४ जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहूमत मिळवले. लिबरल पक्षाचा अध्यक्ष ह्या नात्याने जस्टिन त्रूदो कॅनडाचा नवा पंतप्रधान असेल.

बाह्य दुवे

संपादन