हिंदू पुराणांनुसार जयंती (संस्कृत: जयन्ती ;) ही वैवस्वत मन्वंतरातील पुरंदर नावाच्या इंद्राची कन्या होती. हिला जयंत नावाचा भाऊ होता. देवांचे विरोधक असणाऱ्या दैत्यांचा गुरू असलेला भृगुपुत्र शुक्राचार्य यांच्याशी हिचे लग्न झाले. शुक्राचार्यापासून हिला देवयानी ही कन्या झाली.[] विष्णू पुराण, वायु पुराण आणि भागवत पुराण यांमध्ये दैत्यगुरू शुक्राचार्याला स्वतःकडे आकर्षून त्याच्या तपस्येत विघ्न आणण्याची जबाबदारी हिच्यावर इंद्राने सोपवल्याचे व तिने ती कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडल्याचे उल्लेख आढळतात. शुक्राचार्याची सेवा करून जयंतीने त्यांचे मन जिंकले. पुढे शिवाकडून ईप्सित वर मिळाल्यानंतर शुक्राचार्यांनी तिच्याशी विवाह करून गृहस्थाश्रम स्वीकारला.

स्कंद पुराणातील फरक

संपादन

दक्षिण भारतात प्रचलित स्कंद पुराणात मात्र इंद्रकन्या आणि जयंताची बहीण म्हणून देवयानीचा उल्लेख होतो. स्कंद पुराणातील देवयानीचा विवाह कार्तिकेयाशी झाला.


पहा : प्रसिद्ध पुरुषांच्या बहिणी

संदर्भ

संपादन
  1. ^ "जेनी.कॉम - जयंती" (इंग्रजी भाषेत). १२ जानेवारी, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)