जंबिया (अरबी: جنبية ) म्हणजे खंजिरासारखे एक अरबी पात्याचे शस्त्र होय. याला बाकदार, थोटके व २ ते ३ इंच रुंदीचे पाते असते. याची मूठ गेंड्यांच्या शिंगांपासून अथवा लाकडापासून बनवतात. जंबिया ठेवण्यासाठी लाकडी किंवा चामडी म्यान असते.

येमेनातील जंबिया

अरब देशांत व प्रामुख्याने येमेनात हे शस्त्र पुष्कळ प्रचलित असून पुरुषांच्या पेहेरावाचा भाग म्हणून बाळगले जाते. येमेनी लग्नांमध्ये वऱ्हाडी पुरुषांनी हातांत जंबिये धरून नृत्य करण्याची रीत आहे.

चित्रदालन

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत