चिरनेर
चिरनेर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील एक गाव आहे. चिरनेर नवसाला पावणारे अशी ख्याती असलेले श्री महागणपती मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार पेशव्यांचे सरदार रामजी महादेव फडके यांनी केला होता.
?चिरनेर महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | उरण |
जिल्हा | रायगड जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
इतिहास
संपादनइंग्रज सरकारने लाकूडतोड व जंगलापासून मिळणाऱ्या जीवनावश्यक गोष्टी मिळवण्यास गावकऱ्यांना बंदी घातली. याविरोधात स्थानिकांनी आंदोलन छेडले होते. २५ स्प्टेंबर १९३० रोजी इंग्रज सरकार विरुद्ध श्री महागणपती मंदिर येथे मोठा जंगल सत्याग्रह झाला होता. त्यावेळी येथील निःशस्त्र भारतीयांवर इंग्रजांनी गोळीबार केला केला होता. यात सत्याग्रही मृत्युमुखी पडले तर अनेकांना अपंगत्व आले. गोळी लागलेला गज आजही येथे पहावयास मिळतो. उठावाची आठवण म्हणून येथे हुतात्मा स्मारक उभारले आहे. येथे विविध गधेगळ (गधेगोळ) - आक्रमकांविरुद्ध लाढाईमध्ये वीरगति प्राप्त झालेल्या योध्यांची कोरलेली स्मारके - दिसून येतात. ही बहुदा शिलाहार कालीन असावीत.
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
लोकजीवन
संपादनया भागात कोळी, आगरी, आदिवासी समाजाचे वास्तव्य आहे.
प्रेक्षणीय स्थळे
संपादनयेथील भैरव मंदिर, शिव मंदिर आणि देवतळे प्रेक्षणीय आहे. शिवाय येथे बापूजी देव मंदिर, खंडोबा मंदिर, कातळपाडा येथील नवीनच दत्त मंदिर हे अतिशय सुंदर आणि पावित्र्य राखलेली ठिकाणे आहेत.